एकाच रात्री ६ घरफोड्यांचा म्हसळयात प्रकार ...
चोरांच्या दहशतीखाली म्हसळा शहर : बंद घरे फोडण्याचे प्रकार वाढले.
संजय खांबेटे : म्हसळा
भरवस्तीत पाच बंद घरे चोरटयानी फोडली त्यामध्ये आज सकाळी मोमीनपुरा येथील एकघर चोरटयानी फोडल्याचे लक्षात आले त्यामुळे आता एकूण सहा घरे फोडल्याचे तपासी अंमलदार संदीप चव्हाण यानी सांगितले. बंद घरांपैकी कन्याशाळा परिसरां तील सुनील द्वारकानाथ उमरटकर यानी दिलेल्या फिर्यादी वरुन गुन्हा रजी नं.८० /२०२१ भा.द.वि.सं. कलम४५४,४५७,३८०प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे.यामध्ये उमरटकर यांचे घरातील देव खोलीतील २५ विविध देवपूजेचे चांदीच्या वस्तू अंदाजे किंमत रु ४१ हजार, सोन्याच्या वस्तू सुमारे १५ हजार व रोख रक्कम रु१२ हजारअसा सुमारे ६८ हजाराचा ऐवज लंपास केला.मंगेश हेगीस्टे यांचे घरांतील रू७०० किमतीच्या चांदीच्या पूजेच्या वस्तू, मोमीन पुरा येथील नवीद घरटकर यांचे घरांतून रु २ हजार पाचशे,साने आळीतील जमाल तळकर यांचे घरांतून रु ५ हजार अशा रोख रक्कमेवर चोरट्यानी डल्ला मारला .बहुतांश घरे बंदआसल्या ने गुन्हे नोंदवि ण्यास विलंब होत आसलातरी प्रत्येक घटनेची नोंद चोरीस गेलेल्या मालासह करण्या त येणारअसल्याचेपोलीस सूत्रानी सांगितले.
म्हसळा पोलीसांचे अकार्यक्षमते बद्दल चर्चेला उधाण.
म्हसळा पोलीस रात्रीची गस्त केवळ जीपचा सायरन वाजवत करतात,पूर्वी पूर्ण शहरांत किमान ३ ते ४ पोलीस पायी गस्त घालत. पोलीस स्टेशनचे हद्दीत नविन नविन समुहाने येणारे विविध फिरस्ते, फेरीवाले, भंगारवाले यांची योग्य त्या रजीस्टर मध्ये आधार,त्यांचे मूळ पत्ता या सर्वांची नोंद होणे जरुरीचे आहे. म्हसळा पोलीस स्टेशन मध्ये आवश्यकते नुसार स्टाफ नसल्याने आधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कामांचा प्रचंड ताण येतो व नंतर त्याचे मानसिक ताण-तणावात रुपांतर होते.
"राज्याचे गृह विभागाने पोलिसां वर ताण न येणे, नागरिकाना सुविधा गतिमान,तात्काळ पुरविणे,गावांत शांतता व सुव्यव स्था राखणे या सर्वांसाठी पोलीस विभागाचे विकेंद्रीकरण करून प्रत्येक तालुक्याला स्वतंत्र पोलीस स्टेशन, प्रमुख म्हणून पोलीस निरीक्षकाची नेमणूक असे असतानाही म्हसळा पोलीस स्टेशनला अद्यापही कायमस्वरूपी पोलीस निरीक्षक, दोनPSI व अनेक पोलीस कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत,ती तात्काळ भर ल्यास म्हसळा कराना पारदर्शक व गतीमान सेवा मिळेल"
Post a Comment