म्हसळा तालुक्यात लसीकरणाचा वेग मंदावला


 पाहिला डोस केवळ ६२% नागरिकानी घेतला तर
६०% पात्र लाभार्थानी दुसरा डोसला दाखविली पाठ .

संजय खांबेटे : म्हसळा 
 म्हसळा तालुक्याची लोकसंख्या५९,९१४ असून तालुक्याची आरोग्य व्यवस्था म्हसळा शहरातील एक ग्रामिण रुग्णालय आणि तालुक्यातील म्हसळा,मेंदडी, खामगांव येथील३ प्रा.आ.केंद्र याच्यावर विसंबून आहे.त्यांच्याच माध्यमातून तालुक्यात लसीकरण मोहीम राबविली जात आहे.२३ डिसेंबर२०२१कोविड १९च्या प्राप्त अहवालानुसार म्हसळा तालुक्यातील ३३०४९ नागरिका नी पाहिला डोस,तर २०७३२ नागरिकानी दुसरा डोस घेतला आहे. ह्याची टक्केवारी पहाता पाहिला डोस ६२ % नागरिकानी घेतला तर दुसऱ्या डोसकडे ६०% नागरीकानी पाठ फिरवल्याचे चित्र आहे.करोनाची संख्या काहीशी कमी व स्थिर दिसून येत असल्या नेच आता करोनाचा धोका संपला, या भ्रमात नागरिकांनी लसीकरणाकडे पाठ केल्याचे स्पष्ट होत आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातील परिस्थिती किंचित बरी असल्याचे समोर येत आहे. तालुक्यातील ग्रामिण भागातील २३ हजार८१४ नागरिकानी पाहिला डोस तर शहरातील ९२३५ नागरिकानी पाहिला डोस  घेतल्याचे अहवालात म्हटले आहे.पहिल्या डोसचे सरासरी प्रमाण ६२ टक्के व दुसऱ्या डोसचे सरासरी प्रमाण ४० टक्के आहे.यानिमित्ताने लसीकरण संथ गतीने सुरू असल्याचे समोर येत आहे. कोरोना व्हायरसअद्याप पूर्णतः गेला नाही. काही देशात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसने डोकं वर काढलं आहे.त्यातच डिसेंबर महिना संपतआला आहे आणि सरकारने कोविड-19 (Covid-19) विरुद्ध लसीकरणा बाबत घोषित केलेला कालावधी पूर्ण होण्यास फारच कमी वेळ शिल्लक आहे. 

"केंद्राकडून राज्याकडे आणि राज्याकडून रायगड जिल्ह्याला मिळणाऱ्या लशींच्या साठय़ाचे प्रमाण पुरेसे आहे.लसीकरण केंद्रांवर आता पूर्वीसारखी गर्दी नसते. ग्रामीण भागातील दुर्गम गांव- वाडयांमध्ये लसीकरणाचे प्रमाण कमी असल्याने लसीकर- णाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती होणे गरजेचे आहे."

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा