म्हसळा - प्रतिनिधी श्रीकांत बिरवाडकर
राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्यातील नगर पंचायत निवडणूकीचा सार्वत्रिक कार्यक्रम घोषित केले नुसार दिनांक 21 डिसेंबर 2021 रोजी निवडणूक होणार आहे या कामी दिनांक 30 नोव्हेंबर रोजी मा.जिल्हाधिकारी रायगड यांनी निवडणूक कार्यक्रम प्रसिद्ध केले नुसार शासनाच्या नियमानुसार दिलेल्या त्या तारखेला व वेळेत पूर्ण करण्यासाठी तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांनी व निवडणूक लढवु इच्छित उमेदवार यांनी होणारी म्हसळा नगर पंचायत निवडणूक शांततेत आणि सुव्यवस्थेत पार पाडण्यासाठी शासनास अर्थात निवडणूक आयोगास सहकार्य करावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन अमित शेडगे यांनी सर्व पक्षीय पदाधिकारी व प्रतिनिधी यांचे कडे वार्तालाप करताना व्यक्त केले. निवडणूक कामी इच्छुक उमेदवार यांना उमेदवारी अर्ज दाखल करणे कामी आवश्यक वाटणारी माहिती अर्थात आवश्यक अर्जाची कागदपत्रे, अर्जाची छाननी करणे, अर्ज मागे घेणे, उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे कार्यालयीन वेळापत्रक, आदर्श आचारसंहिता नियम व अटी, पक्षीय सभा बैठका बाबतीत परवानगीचे नियम व शर्थी, कोरोना प्रादुर्भाव नियमावली, ऑनलाइन पद्धती आदी आवश्यक त्या माहीती होणेसाठी प्रांताधिकारी अमित शेडगे यांनी म्हसळा तहसीलदार कार्यालयात तालुका सर्वपक्षीय पक्षप्रमुखांची मिटिंग आयोजित केली होती.
या वेळी मिटिंगला त्यांचे समावेत सहाय्यक नि.नि.अ.तथा नगर पंचायत मुख्याधिकारी मनोज उकिर्डे, काँग्रेस पक्षाचे ता.अध्यक्ष डॉ.मुविज शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय कर्णिक, शेकापचे ता. चिटणीस संतोष पाटील, भाजपचे ता.अध्यक्ष प्रकाश रायकर, निकेश कोकचा, असल कादरी, भरत चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
Post a Comment