(म्हसळा प्रतिनिधी)
मागील पंधरवडया पासून म्हसळा शहरांत सुखावणारी थंडी आणि आजची संकष्टी - उद्याचा गुरूवार असे उपवासाचे निमित्ताने बाजारात विविध फळांची आवक प्रचंड वाढली असून भाज्यांपेक्षा फळे स्वस्त झाल्यामुळे ग्राहकांकडून मागणीही वाढत असल्याचे दिसते.म्हसळा शहरांत फळ विक्रीत्यांसाठी नगरपंचायतीने स्वतंत्र व्यवस्था केली नसली तरी शहरांतील किमान २० फळे आणि केळी विक्रीते ग्राहकांच्या आणि वाहतुकीच्या सोयीनुसार आपापला माल हातगाडी किंवा रस्त्यावर विकतअसतात.सध्यस्थितीत बाजारांत सफरचंद,डाळींब, संत्री,मोसंबी,द्राक्षे,चिकू,पेरू, पपई, कलींगड, बोर,अँपल बोर ची आवक चांगली असून सणा सुदीच्या दिवसात मागणी वाढल्याचे चित्र आहे.तर भावही सामान्य ग्राहकाना परवडणारे आहेत, सफरचंद व द्राक्षाचा भाव रू१०० ते१२५ (प्र.कि) तर अन्य फळांचा भावरु८० ते१००(प्र.कि) आहे.पपई रु५०ते ६०(प्र.कि),कलिंगड सर्वांत स्वस्त असून ते रु२५ते ३०(प्र.कि.) आहे. नोव्हेंबर पासून फळांची आवक वाढण्यास सुरुवात होत असते. त्यानुसार, बाहेरून येणाऱ्या फळांसोबत स्थानिक पेरू, चिकू सुद्धा रेलचेल आहे. बाजारात सफरचंदांमध्ये अनेक प्रकार असून चिली सफरचंद, चायना सफरचंद, काश्मिरी सफरचंद पाहायला मिळत आहेत.काश्मिरी सफरचंदाला सर्वाधिक मागणी आहे. सफरचंदाची उपलब्धता अधिक असल्याने दर सर्व सामान्यांना परवडणारे असल्याची माहिती जयसींग शिंदे (मूळचे माधव नगर सांगली)या म्हसळा एसटी स्टँड वरील विक्रेत्यांनी दिली. डाळींब नाशिक आणि सोलापूर ची आणि चिकू गुजरातहून दाखल झाले आहेत.
" म्हसळा शहरापेक्षा सध्या म्हसळा एस.टी.स्टँड परिसरांत जयसींग शिंदे यांच्या स्टॉल क्र मिळणारी फळे स्वस्त व ताजी (Fresh) आसल्याने ग्राहकां च्या पसंतीला येतात".
संतोष म्हात्रे,खारगाव (खु).
Post a Comment