समाजातील अल्पसंख्यांक समुदयाला प्रगतीची समान संधी मिळाली पाहीजे : प्रा. महमद शेख .



(म्हसळा प्रतिनिधी)
समाजातील अल्पसंख्यांक समुदयाला प्रगतीची समान संधी मिळाली पाहीजे,तशी संधी भारतीय संविधानाने समतेच्या तत्वाने अल्पसंख्यांक समुदयाला दिली आहे, अल्पसंख्यांकाना राष्ट्रीय प्रवाहात आणण्यासाठी त्या पद्धतीने घटनात्मक तरतूद केली आसल्याचे स्पष्ट मत प्रा.महमद शेख यानी वसंतराव नाईक महाविद्यालयांत आंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांक दिन साजरा करताना प्रमुख अतिथी म्हणून मांडले, कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी कॉलजचे प्राचार्य माच्छिंद्र जाधव होते,यावेळी प्रा.शिरीष समेळ,प्रा.सिद्दीकी, प्रा.संजय बेंद्रे, प्रा.दिगंबर टेकळे, प्रा.सुमित चव्हाण,प्रा. दुंडे, प्रा.श्रीमती सलमा नजीरी, प्रा.आसिका नजीरी, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी -विद्यार्थीनी उपस्थित होते.यावेळी शेख यानी संविधानाविषयी आदर करताना विद्यार्थाना संविधानाचे महत्व सांगत. संविधानामुळेच अल्पसंख्यांकाना जिवन जगण्याची संधी मिळाली आहे. त्याचा पुरेपुर व सर्व कष लाभ अल्पसंख्यांक समाजाने घेणे हाच खरा संविधानाचा आदर ठरेल.अल्पसंख्यांक विद्यार्थ्या सह सर्वांनाच शासनाने विविध नाविन्यपूर्ण योजना दिल्या आहेत, प्रत्येकाने त्याचा लाभ घेणे आवश्यक आहे. यावेळी प्रा.संजय बेंद्रे यानी मान्यवरचे व विद्यार्थांचे आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा