म्हसळ्यात शेकापक्षाचे जयंत पाटलांची तोफ धडधडणार...



नगरपंचायत - ग्रामपंचायती समवेत स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणूकांचे सूत्र ठरणार
(म्हसळा प्रतिनिधी)
रायगड जिल्ह्यसह म्हसळयांत होऊ घातलेल्या 
नगरपंचायत, ग्रामपंचायत निवडणुकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणुकींच्या पार्श्व भूमीवर म्हसळा तालुक्यातील शेकापक्षाचे कार्यकर्त्याच्या मेळाव्याचे आयोजन तालुका सरचिटणीस संतोष पाटील व पुरोगामी युवक संघटनेचे अध्यक्ष निलेश मांदाडकर व अन्य पदाधिकाऱ्यानी शनी. दिं.४ डिसेंबर रोजी सकाळी १० वा.पाच गाव आगरी समाज संघटना सभागृहात केले आहे.शेकापक्षाची बुलंद व मुलुख मैदान तोफ असलेले मा.आमदार भाई जयंत पाटील, हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित रहाणार असून, पंडीतशेठ पाटील,जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील यांचेही मार्गदर्शन होणार असल्याचे विनायक गिजे यानी सांगितले. म्हसळा नगरपंचायतीचे निवडणूकीत राज्याचे महाविकास आघाडीतील शिवसेना आणि काँग्रेस ह्या दोन पक्षांचे राजकीय विचार जुळत असतानाच भाई जयंत पाटील कोणती भूमिका घेणार आणि भविष्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणुकांत कोणती भूमिका असणार ह्याकडे राजकिय धुरंदराचे लक्ष लागले आहे. सन १९९०-९५ चे दरम्यान  म्हसळा तालुका पंचायत समितीवर शेकापक्षाचे  निर्विवाद बहुमत होते तर म्हसळा,मेंदडी, गोंडघर,वारळ , तुरुंबाडी या आगरी पट्टयांत, तसेच खाडी पट्टयांतील भागातही शेकापक्षाचे कार्यकर्ते मोठया प्रमाणावर होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा