म्हसळ्यात पावसाची दिवसभर रिप-रिप तर सायंकाळी मेधगर्जनेसह मुसळधार पाऊस



संजय खांबेटे : म्हसळा 
म्हसळा तालुक्यांत यंदा सरासरीच्या तुलनेत ( Heavy Rain) अधिकचा पाऊस झाला आहे. म्हसळा तालुक्यात एकूण ४०५३ मि.मि.पवसाची नोंद झाली आहे.आज पहाटे पासूनच म्हसळ्यात दिवसभर पावसाची रिपरिप होती व ढगाच्छादीत वातावरण होते त्यामुळे हवामानात दिवसभर गारवा जाणवत होता. आज हवामान कमाल २६ तर किमान २३ अंश सेल्सीयसची नोंद होती. केवळ पावसाळ्यातच नाही तर आता अवकाळी पाऊसही शेतकरी आणि फळबागायतांसाठी नुकसानीचा ठरत आहे.

अवकाळी पावसाने होत आहे आर्थिक नुकसान
रब्बी हंगामात १५ ते २० % शेतकऱ्यानी शेतांत वाल,चवळी, मूग, मटकी अशी कडधान्ये पेरली आहेत अवकाळी पावसाचा उगवणीवर परिणाम होणार आहे,तालुक्यांत १५ % आंबा बागायतीत दाणा , कैरी धरली आहे, अन्य बहुतांश बागायतींत मोहर आला आहे, अवकाळी पाऊस व बदलते हवामानामुळे बागायतींत आंबा मोहोरावर बुरशी रोगाचा प्रादुर्भाव वाढेल. पाणी कैरीवर पडल्यामुळे काळे डाग पडून दर्जावर परिणाम होऊ शकतो. मोहोर, कणी गळून पडण्याची भीती पाभरे येथील प्रगतीशील शेतकरी रशीद फकीह यानी व्यक्त केली आहे .तालुक्यांत मोठया प्रमाणावर विट उत्पादन होत असते, आजच्या पावसामुळे हा व्यवसाय किमान १५ते २० दिवस पुढे जाईल. याचा बांधकाम व्यवसायाला फार मोठा आर्थिक फटका बसू शकतो असा जाणकारांचा आंदाज आहे.

"भारतीय प्रादेशिक हवामान खात्याने दिनांक 30/11/2021 रोजी दिलेल्या माहितीनुसार नुसार दक्षिण-पूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीपवर चक्रियस्थिती असून तेथून पूर्व-मध्य अरबी समुद्रात द्रोणीय स्थिती आहे. त्यामुळे येत्या २४ तासात दक्षिण-पूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीपमध्ये कमी दाबाच्या क्षेत्राची शक्यता राहील. त्यामुळे रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ / सोसाट्याचा वारा आणि काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुढचे ३ दिवस राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. "

सायंकाळी ५ वाजता पाभरे नदीवरील ढगाच्छादीत दृश्य

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा