आळंदीवारीने आदीवासी वारकरी सुखावले.
(म्हसळा प्रतिनिधी)
नुकतेच आळंदी येथील कार्तिकी यात्रा सोहळा निमीत्ताने शांतिदूत परिवाराचे मार्गदर्शक व माऊली डॉ. विठ्ठल जाधव IPS IG (से.नि) व सौ. तृषालीताई जाधव राष्ट्रीय अध्यक्षा यानी म्हसळा व माणगाव येथील आदिवासी बांधव व भगिनी सोबत पांडुरंगाची ग्राम प्रदक्षिणाचा योग साधला यावेळी प्रदक्षिणा बरोबर पांडुरंगाच्या पादुकांना इंद्रायणी स्नान घालण्यात आले. आपले अदिवासी बांधव व भगिनी संसाराच्या सगळ्या चिंता घरी ठेवून, सोबत पालखीतील कीर्तनकार व महाराज सारे एकत्र येऊन टाळ-मृदुंगाच्या गजरात सारे वारकरी हरि नामाचा गजर करत अंतर भावभक्तीने जल्लोषात सोहळा पार पाडला. शांतिदूत परिवाराचे डॉ. विठ्ठल जाधव व सौ. तृषालीताई जाधव , श्री.अजितदादा वडगावकर, सचिव ज्ञानेश्वर शिक्षण संस्था आळंदी यांनी वासकर फडावर अदिवासी परिवाराला मानाचे स्थान देऊन यशवंत गोपाळ पवार व त्यांचे कुटुंब व सौ.जानकीताई मांडवकर अध्यक्ष आदिवासी महिला मंडळ, लक्ष्मण जाधव, सर्व राहणारे ता.महसळा, जि.रायगड आणि भगवान काटकर रा.माणगाव आदिवासीवाडी यां सर्वांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. वासकर फड हा वारकरी संप्रदायातील एक प्रमुख फडां पैकी एक फड़ आहे. अजितदादा वडगावकर यांच्या समावेत श्री. ज्ञानेश्वर शिक्षण संस्था आळंदी येथे भेट देण्यात आली. पद्मनाथ स्वामी पदप्रणित संप्रदाय भारती गुरुवर्य समाज भूषण ह.भ.प एकनाथ वाडीकर महाराज यांच्या उपस्थित जि.रायगड,ता. पाली येथील महाराज किरण कुंभार यांच्या हस्ते डॉ.विठ्ठल जाधव IPS व सौ. तृषालीताई जाधव व त्यांचे पती श्री.योगेश साहेब यांचे श्रीफळ देऊन सम्मानीत करण्यात आले. मानवसेवा व येणाऱ्या काळात अध्यात्मिक ज्ञानाचा महत्व समाजापुढे नेऊन कसे एकत्र मानवसेवा व निसर्गसेवा करता येईल याची सखोल चर्चा यावेळी शांतिदूत परिवाराचे डॉ.विठ्ठल जाधव IPS व सौ.तृषालीताई जाधव यांच्यामध्ये झाली. मा.नामदेवमहाराज वासकर, मा.एकनाथ महाराज वासकर,मा. विठ्ठलराव महाराज वासकर, मा. चैतन्य महाराज वासकर, हरिभक्त पारायण मा.विष्णुबुवा महाराज चक्रांकित,श्रीपती बाबा दिंडीचे प्रमुख शिवाजी राव वरपे असे अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
Post a Comment