तळा शहरात पार्किंगची समस्या, प्रशासनाचे दुर्लक्ष ; ट्राफीकपोलीसची वानवा.



तळा:किशोर पितळे
तालुका निर्माण होऊन २२ वर्षाचा कालावधी लोटला आहे. २०१६ पर्यंत ग्रामपंचायत कार्यरत होती त्यानंतर नगरपंचायतीत रुपांतर होऊन शहर विकासीत होत गेले परंतु अजूनही पाहिजे तसा विकास झाला नाही. टोलेजंग इमारती हाच विकास पहायला मिळत आहे. पण इतर बाबतीत अविकसित आहे. ४५/५० गाव वाड्या वस्ती सह तालुक्याची महत्त्वाची बाजारपेठ आहे. बाजारपेठेत अरुंद रस्ते आणि बाजूला असलेली उंच गटारे हि प्रामुख्याने वाहतूक कोंडीची कारणे, दुतर्फाना अतिक्रमणे अशा समस्याच्या गुरफट्यात बाजारपेठ आहे. आधीच व्यवसायाची स्थिती चिंताजनक आहे. या गंभीर समस्या बाबत व ट्राफिक पोलीसची मागणी अनेक वेळा तळा पत्रकार संघाने वृतपत्राचे माध्यमातून व समन्वयक समीती पुढे समस्या निदर्शनास आणून देऊन हि नगरपंचायत पोलीस  प्रशासन मात्र कठोर भूमिका का घेत नाही.? याला अभय कोणाचे ? असा सवाल नागरिक करीत आहेत. उदरनिर्वाहसाठी छोटे व्यवसाय करून जीवन काढत आहेत. इतर उत्पन्न साधन नसल्याने मोठ्या शहराकडे स्थलांतर करीत असल्याने व्यवसाय आधीच डबघाईला आले आहेत. नेते मंडळींनी निवडणूकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाच पाऊस तळा तालुक्यात कधी पडलाच नाही. असे झाले नाही निवडणूकीपूर्वी आश्वासनांचे वारे जोरातवाहतात आणि निवडणुका झाल्या कि पुन्हा आश्वासनांचे वारे मंदावतात. त्यात दुकानदारांना आता नवीन संकटाला समोर जावे लागत आहे, ते संकट म्हणजे बाजारपेठेत अवैध पार्किंग. आधीच तळा शहरात व्यवसाय करणे शक्य होत नाहीये. अवैद्य पार्किंग या कारणाने वाहन चालक आणि दुकानदार हैराण झाले आहेत. तळा पोलीस ठाण्यात एकही वाहतूक कर्मचारी नाही आणि नगरपंचायतीकडे वाहनतळ नाही. या दोन्ही कारणाने अवैध्य पार्किंगची समस्या वाढत चालली आहे त्यामुळे प्रचंड महसूल बुडत आहे प्रशासनाने कठोर तोडगा काढून बाजारपेठेचा श्वास मोकळा करावा अशी कळकळीची विनंती नागरिक करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा