कुडपण येथे कविसंमेलन उत्साहात साजरे


मिलिंद खारपाटील
महावीर चक्राने सन्मानित सुभेदार कृष्णाजी सोनावणे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून दि 14 नोव्हेंबर रोजी कोकण मराठी साहित्य परिषदेकडून कुडपण येथील सुभेदार वाडा येथे कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आलेले कविसंमेलन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले.
सुभेदार सोनावणे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना मानवंदना देण्यात आली.
यावेळी  प्रा.एल बी पाटील, अ वी जंगम ,संजय होळकर, मिलिंद खारपाटील, म का म्हात्रे,शीतल मालुसरे,  मंदाकिनी हांडे, शारदा खारपाटील, शीला भगत आदी कवींनी कविता सादर केल्या. जमलेल्या समस्त साहित्यप्रेमीनी जोरदार टाळ्या वाजवून कवितांना दाद दिली.
सदर कविसंमेलनाचे अध्यक्ष  शिवसेना उरण मतदार संघ संपर्कप्रमुख   महादेव घरत हे होते.शिवसेना उरण तालुका उपसंघटक अमित भगत, डोंगरी चे शिवसेना शाखाप्रमुख अमित भगत, गणेश पाटील, सूरज परदेशी , मिथुन म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते. ऐतिहासिक, निसर्गरम्य परिसर पाहून धन्य झालो. यापुढे कुडपण  ला पुन्हा पुन्हा येऊ असेही ते म्हणाले. कुडपण ग्रामस्थांच्या वतीने अरविंद शेलार, मंगेश चिकने आणि दिपक सोनावणे यांच्या हस्ते अध्यक्ष याना सन्मानित केले.व्यवस्थापान महावीर चक्र कृष्णाजी सोनावणे चॅरिटी ट्रस्टकडून करण्यात आले होते.आभार  कृष्णाजी सोनवणे यांचे चिरंजीव रमेश सोनावणे यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा