म्हसळा मनसे तालुका अध्यक्षपदी स्वप्नील करडे यांची निवड

टीम म्हसळा लाईव्ह
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार म्हसळा तालुका अध्यक्षपदी स्वप्नील करडे यांची निवड करण्यात आली सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले अगदी थोड्या दिवसात राजकीय पक्षात प्रवेश करून आपला ठसा उमटवणारे स्वप्नील करडे यांची निवड झाल्याने सर्वत्र त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
 आगामी सर्व निवडणूकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना कशी अग्रेसर करणार होईल ह्यासाठी प्रयत्न असल्याचे तसेच गाव तेथे शाखा उघडणार असल्याचे करडे यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना सांगितले. म्हसळा शहरातील इतर पक्षातील पदाधिकारी आणि अनेक युवक मनसेमध्ये लवकरच प्रवेश करणार असल्याचे पुढे बोलताना करडे यांनी सांगितले.

WEB Title - Swapnil Karade elected as Mhasla MNS taluka president

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा