टीम म्हसळा लाईव्ह
माजी तालुका प्रमुख महादेव पाटील यांनी राजीनामा दिला असता त्यांच्या रिक्त असलेल्या तालुका प्रमुख पदावर म्हसळा शहरातील ज्येष्ठ शिवसैनिक सुरेश कुडेकर यांची तालुका प्रमुखपदी नियुक्ती झाली आहे . शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार त्यांची नियुक्ती करण्यात आली . अनेक दिवसांपासून म्हसळा तालुका शिवसेना पक्षात निर्माण झालेली मरगळ , गटबाजी यातून पक्षाला सावरण्याचे मोठे आव्हान नवनियुक्त तालुका प्रमुखांच्या खांद्यावर असणार आहे . सुरेश कुडेकर हे अनेकवर्षापासून राजकिय , सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत . शिवसेना उपशहर प्रमुख , विभागप्रमुख , ग्रा.पं. सदस्यपदी काम केले आहे . त्यांच्या या नियुक्तीबद्दल दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगणे , माजी जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर , ज्येष्ठ शिवसैनिक भाऊ करडे , माजी तालुका प्रमुख महादेव पाटील , राजाराम तीलटकर , श्री. कांबळे , शहरप्रमुख अनिकेत पानसरे , गजानन शिंदे , अनिल काप , अमित महामुनकर यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या .
Post a Comment