रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात आज दिनांक १८ नोव्हेंबर रोजी उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे डायलिसिस केंद्राचे उदघाटन रायगड च्या पालकमंत्री मा आदितीताई तटकरे राज्यमंत्री रायगड यांचे शुभहस्ते करण्यात आले.
"' मुत्रपिंड विकाराच्या उपचारासाठी डायलिसिस महत्वाचा घटक असून ही सुविधा नागरिकांना उपजिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी उपलब्ध झाल्यास त्याचा गरजू रुग्णांना फायदा होणार आहे. तसेच रायगड जिल्ह्यात आणखी नवीन डायलिसिस केंद्र लवकरात लवकर उभारण्यात येणार असून त्यामुळे रायगड वासियांना जिल्ह्यातच डायलिसिस केंद्र झाल्याने रुग्णांचा नक्कीच यासाठी वाया जाणारा खर्च व वेळ वाचणार असून त्यामुळे त्याचा फायदा रुग्णांना मिळणार आहे. येथे डायलिसिस माफक दरात करण्यात येणार असून त्यामुळे येथील रुग्णांना त्याचा लाभ मिळणार असून खासगी रुग्णालयात जावे लागणार नाही. "' असे यावेळी रायगड च्या पालकमंत्री मा आदितीताई तटकरे यांनी सांगितले.
"' रायगड जिल्ह्यात नवीन केंद्राची संख्या सर्वाधिक असून उपजिल्हा रुग्णालय पेण, रोहा, माणगाव, श्रीवर्धन आणि कर्जत येथे प्रत्येकी एक केंद्र येथे डायलसिस मशिन येणार आहे. एका तालुक्यात डायलिसिस केंद्र असल्यामुळे त्याचा फायदा हा त्या तालुक्याच्या जवळ असणाऱ्या इतर दोन ते तीन तालुक्यांना होणार आहे. तसेच माणगाव उपजिल्हा रुग्णालयात आय सी यू खाटांची संख्या वाढविली आहे, प्राणवायू असलेल्या खाटांची संख्या योग्य प्रमाणात असून येथे प्राणवायू साठी मोठी टाकी बसविण्यात आली असून जर कोरोना ची तिसरी लाट आली तर येथील रुग्णालय प्रशासन सज्ज आहे. "' असे यावेळी रायगड च्या पालकमंत्री मा आदितीताई तटकरे यांनी सांगितले.
मुत्रपिंड विकाराच्या रुग्णांना उपचारासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या डायलिसिस सुविधेसाठी
आरोग्य विभागातर्फे राज्यात ३५ नवीन डायलसिस केंद्र सुरु करण्यात येणार आहेत.
कोकणातील ठाणे जिल्ह्यात २, रायगड ८, पालघर २, रत्नागिरी ४ असे एकूण १६ नवीन डायलिसिस मशिन बसविण्यात येणार आहेत.
त्यापैकी एक डायलिसिस केंद्राचे उद्घाटन उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे झाले.
त्यावेळेस मा अनिकेत तटकरे आमदार विधानपरिषद , रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रदीप इंगोले व इतर मान्यवर , रुग्णालयाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
Post a Comment