नगरपंचायत आरक्षण सोडत जाहीर : म्हसळ्यात येणार महीला राज
संजय खांबेटे : म्हसळा
आगामी म्हसळा नगरपंचायतीच्या निवडणु कीसाठी प्रारुप प्रभाग रचना आणि प्रभाग आरक्षण सोडत आज सोमवार(ता. १५) रोजी म्हसळा कन्या शाळा हॉलमध्ये चिठ्ठी द्वारे काढण्यात आली.सतरा जागांसाठी सतरा प्रभाग तयार करण्यात आले असून एका प्रभागातून एक सदस्य नगरपंचायती वर निवडून जाणार आहे.महिलांना पन्नास टक्के आरक्षण देण्यात आले आहे. यात सर्वसाधारण गटातून पाच महिला, अनु. जामातीतील एक,अनुसुचित जातीतील एक महिला,ओबीसी (ना.मा.प्र)गटातून दोन महिला आशा महिलांसाठी नऊ जागा राखीव आहेत.त्यामुळे भविष्यात नगर पंचायतीमध्ये महिला राज असणार आहे. यावेळी श्रीवर्धनचे प्रांताधिकारी अमित शेडगे पिठासन अधिकारी होते. तहसीलदार समीर घारे,म्हसळा नगर पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज उर्कीडे, नायब तहसीलदार के.टी.भिंगारे,शिवसेना तालुका प्रमुख सुरेश कुडेकर, संजय कर्णिक, संजय खताते, करण गायकवाड, चंद्रकांत कापरे, सुहेब हळदे, बाबाजान पठाण, अशी विविध राजकीय आणि बहुतांश पत्रकार मंडळी उपस्थित होती.
प्रभाग निहाय आरक्षण सोडत पुढीलप्रमाणे
१)प्रभाग क्रमांक १- अनुसुचित जमाती महीला
२) प्रभाग क्रमांक २ - ना.मा.प्र. महिला
3) प्रभाग क्रमांक ३- सर्वसाधारण महिला
४) प्रभाग क्रमांक ४- अनुसुचित जाती महिला .
५) प्रभाग क्रमांक ५ - सर्वसाधारण महिला
६) प्रभाग क्रमांक ६ - सर्वसाधारण.
७) प्रभाग क्रमांक ७ - नागरिकांचा मागास प्रवर्ग
८) प्रभाग क्रमांक ८ - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला.
९) प्रभाग क्रमांक ९ -नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण.
१०) प्रभाग क्रमांक १०- सर्वसाधारण
११) प्रभाग क्रमांक ११ - सर्वसाधारण महीला.
१२) प्रभाग क्रमांक १२ - सर्वसाधारण
१३) प्रभाग क्रमांक १३ -सर्वसाधारण महिला.
१४) प्रभाग क्रमांक १४ - सर्वसाधारण.
१५) प्रभाग क्रमांक १५ - सर्वसाधारण महिला.
१६) प्रभाग क्रमांक १६- सर्वसाधारण.
१७) प्रभाग क्रमांक १७ - सर्वसाधारण.
प्रभाग निहाय एससी, एसटी, ओबीसी आरक्षण हे लोकसंख्येच्या टक्के वारीनुसार काढण्यात येते. असे पिठासीन अधिकारी अमित शेडगे यांनी सांगितले, आज पासून गुरुवार दि. १८ नोव्हेंबर पर्यत नागरिकांना यावर हरकती आणि सुचना घेण्यात येतील. शुक्रवार दिं.१९ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयात हरकतींवर सुनावणी होईल. असे मुख्य कार्यकारी अधिकार मनोज ऊर्कीडे यांनी सांगितले, हरकती घेण्यासाठी किमान आठ दिवसांचा कालावधी हवा होता, अशी चर्चा व कुजबूज उपस्थितांच्यात होती. याबाबत कोणीही लेखी मागणी केली नसल्याचे समजते.
Post a Comment