राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व जनकल्याण समिती रोहा यांच्या मार्फत मुचणेे वनवासी वाडी येथे भाऊबीज व दिवाळी फराळ वाटप .



मुचणेे आदीवासी वाडीत लौकरच सुरू करणार आभ्यासिका
(प्रतिनिधी म्हसळा)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व जनकल्याण समिती रोहा समूह यांच्या संयुक्त विद्यमाने रोहा तालुक्यातील मुचणेे वनवासी वाडी (आदीवासीवाडी) येथे भाऊबीज व दिवाळी फराळ वाटप कार्यक्रम नुकताच पारपडला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व जनकल्याण समिती रोहा समूह यांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमा साठी प्रमुख पाहुणे म्हणून मूचणे बौद्धवाडी प्रमुख अशोक लोखंडे व प्रदीप पवार ह्यांची उपस्थिती  होती. तर मुचणे वनवासी वाडीचे ग्रामपंचायत सदस्य बबन पवार यांनी या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केले.या कार्यक्रमासाठी रा.स्व.संघ रायगड जिल्हा संघचालक श्री.किसनजी घाग, रा.स्व.संघ जनकल्याण समिती रायगड जिल्हा अध्यक्ष जयेशजी छेडा, रायगड जिल्हा कुटुंब प्रबोधन प्रमुख उत्तमजी भांड, जनकल्याण समिती रायगड जिल्हा कोषाध्यक्ष श्रीपाद गिरधर,जिल्हा सहकार्य वाहीका श्रीमतीअरुंधती पेंडसे, रा.स्व.संघ जनकल्याण समिती रोहा समूह प्रमुख श्रीनिवास साठे(सर) श्रीमती अंजली साठे,संगिता घाग,निलिमा भांड, हेमंतजी ओक,अविनाश दाते,पालवणकर हे पदा धिकारी उपस्थित होते. सुमारे २०० उंबरठा असलेल्या मुचणे आदीवासी वाडीतील २०विधवा वनवासी भगिनींना व अन्य ४० भगिनींना साडी-खण व दिवाळी फराळ वाटप करण्यात आले,शुक्रवार दि. १२ नोव्हें.२०२१रोजी मुचणे आदीवासी वाडीत झालेल्या या कार्यक्रमाला महीला, बाल व युवा गटांतील विद्यार्थ्यांच्यात प्रचंड उत्साह होता.यामुळे आयोजकानी बाल व युवांसाठी प्रथम खेळ व सामुहिक गीतांचा कार्यक्रम घेतला.वाडीतील महीलांची गैरसोय टाळण्यासाठी एक घरघंटी देण्याचे  ठरविण्यात आले.त्यानंतर या वाडीतील तरुणांची बैठक घेण्यात आली. यावेळी तरुणांच्या मदतीने दैनिकअभ्यासिका घेण्याबाबत निश्चित झाले. अभ्यासिके बाबत श्रीनिवास साठे यांचे मार्गदर्शना खाली नियोजन करण्यात येणार आसल्याचे सांगण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा