श्रीवर्धन नगरपालिकेला अग्निशमन शिग्र प्रतिसाद वाहनाचे ना. आदितीताई तटकरे यांच्या हस्ते लोकार्पण



श्रीवर्धन(प्रतिनिधी  ):-जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या अग्निशमन व शिग्र प्रतिसाद वाहनाचे उद्घाटन पालकमंत्री आदितीताई  तटकरे यांच्या हस्ते श्रीवर्धन नगरपरिषद येथे पार पडले. यावेळी तालुकाध्यक्ष दर्शन विचारे नगराध्यक्ष फैसल हूर्जूक उपनगराध्यक्ष यशवंत चौलकर शहरअध्यक्ष जितेंद्र सातनाक आदी मान्यवर उपस्थित होते.
         यावेळी अग्निशमन शिग्र प्रतिसाद वाहनांच्या साह्याने अपघात किंवा आपत्ती ठिकाणी सहजरीत्या  पोहोचता येणार असून आपत्ती व्यवस्थापनासाठी लागणाऱ्या विविध प्रकारची यंत्रसामुग्री या वाहनात उपलब्ध आहेत. तालुक्यात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षात घेता. एखादा अपघाताचा प्रसंग ओढवल्यास या वाहनाचा फायदा होणार आहे असल्याचे मत पालकमंत्री ना. आदिती तटकरे यांनी व्यक्त केलं.  दोन वर्षे आपण नैसर्गिक आपत्तीचा सामना करीत आहोत. त्यासाठी एक वाहन पुरेसं नव्हतं. जिल्ह्यात चक्रीवादळ. महापूर. नैसर्गिक आपत्ती. इमारत दुर्घटना. इत्यादी आपत्तीच्या घटना घडत असतात. आज उपलब्ध होत असलेले वाहन कोणत्याही आपत्तीला सामोरे जाण्यासाठी हे वाहन उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. तसेच जिल्ह्यात कोणतीही आपत्ती आल्यास अत्याधुनिक सुविधा  असलेले   हे वाहन वापरता येईल. यावेळी श्रीवर्धन  नगरपरिषदेला आव्हान करीत उपलब्ध झालेल्या वाहनाची चांगली देखभाल व  मेंटेनेस करावे.तसेच वाहन उभे करण्यासाठी लागणाऱ्या शेडची उपलब्धता लवकरच करणार असल्याचे सांगितले.लोकार्पण कार्यक्रमानंतर नाम अदितीताई तटकरे यांनी डिजिटल लायब्ररीचा प्रत्त्यक्ष जाऊन आढावा घेतला तसेच इनडोअर स्टेडियम बाबत चर्चा केली .

टाइटल - श्रीवर्धन नगरपालिकेला अग्निशमन शिग्र प्रतिसाद वाहनाचे ना. आदितीताई  तटकरे यांच्या हस्ते लोकार्पण (Dedication of Fire Response Vehicle to Shrivardhan Municipality by Adititai Tatkare)

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा