राज्यस्तरीय ज्युडो स्पर्धा सांगलीत सुरू



महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून स्पर्धक सहभागी

सांगली (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्र ज्युडो संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय ज्युडो चॅम्पियनशिप स्पर्धा सांगली येथील 'शांतीनिकेतन लोक विद्यापीठ' येथे उत्साहात सुरू झाली.  महाराष्ट्रातील कानाकोपर्‍यातून स्पर्धक मोठया संख्येने सहभागी झाले आहेत.
स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यास आमदार सुधीरराव गाडगीळ, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, महाराष्ट्र ज्युडो संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. धनंजय भोसले, महासचिव शैलेश टिळक, दत्ता आफळे, रवी पाटील, कावस बिलिमोरिया, यतीश बंगेरा (मुंबई), गौतम पाटील, डॉ. अशोक पाटील, चंद्रशेखर साखरे, राहुल सोनावणे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांचे आयोजकांच्या वतीने स्वागत करण्यात आले.
संघटनेचे अध्यक्ष धनंजय भोसले ह्यांनी आपले विचार व्यक्‍त केले.
ह्या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना पंजाबमधील लुधियाना येथे होणार्‍या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. एमआयएएस, भारत सरकार आणि जेएफआय यांच्या वतीने या राष्ट्रीय स्पर्धा नोव्हेंबरमध्ये होणार आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा