गणराजाच्या दरबारी कोरोनावर स्वारी




मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : बाल गोपाळ सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ (अभ्युदयनगरचा गणराज) आणि बृहन्मुंबई महानगरपालिका अभ्युदय नगर आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने विभागातील १८ वर्षांवरील सर्व व्यक्तींना "कोविशिल्ड" चे पहिले व दुसरे डोस शनिवार दिनांक ३० ऑक्टोबर २०२१ रोजी देण्यात आले. ५० पेक्षा अधिक नागरिकांनी सदर संधीचा लाभ घेऊन राष्ट्रीय संकटाच्या प्रसंगी आपले योगदान दिले.
यावेळी विभागीय नगरसेवक तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका स्थापत्य समिती (शहर) चे अध्यक्ष दत्ताराम पोंगडे, डॉ. विशाल आणि बृहन्मुंबई महानगरपालिका आरोग्य केंद्र (अभ्युदयनगर) व्हॅक्सिन सेंटरचे सर्व कर्मचारी तसेच बाल गोपाळ सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा