रोटरी क्लब रोहा तर्फे स्त्री रोग व दंतचिकित्सा शिबिर संपन्न



रोहा (वार्ताहर)
रोटरी क्लब ऑफ रोहा व जय गिरोबा अंधार आळी ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या स्त्रीरोग चिकित्सा व दंतचिकित्सा शिबिराला उदंड प्रतिसाद लाभला.नवरात्रोत्सवानिमित्त अंधार आळी,रोहा येथे सदर आरोग्य चिकित्सा शिबीर आयोजित केले होते .या कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ रोहाचे प्रेसिडेंट रो.डॉ.वीरेंद्र,रोह्यातील सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ.अमोल खैरकर,पुणे येथील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.उर्वी कोठारी,रोह्यातील डॉ.अनामिका लोहार 
रोटरी क्लब ऑफ रोह्याचे ट्रेझरर रो.संजय नारकर,ए.जी.विक्रम जैन,रमेश डोईफोडे ,आशिष शाह ,
सतीश महाडिक,राजीव शाह,हेमंत ठाकूर ,भावेश जैन,स्वप्नील धनावडे ,प्रदीप मेहता,महिला सदस्या विद्या नुल्ला,सुप्रिया महाडिक,सुनीता नारकर,शीतल शाह,
नीपा शाह,स्वप्नाली निंबाळकर,व अंधार आळी ग्रामस्थ मंडळाचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते .
अनेक महिलांनी व ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घेतला. यावेळी उपस्थीत तज्ञ डॉक्टरांनी व रोटरी क्लब ऑफ रोहाच्या सर्व सदस्यांनी
शिबीर यशस्वी करण्यासाठी बहुमोल सहकार्य केल्याबद्दल ग्रामस्थ मंडळाने त्यांचे आभार मानले .

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा