तळा नगरपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा : विविध पदाधिकाऱी निवडीचा बंपर धमाका.



तळा:किशोर पितळे
भारतीय जनता पार्टीच्या तळा तालुका महिला अध्यक्षपदी प्रमिला ए.चोरगे महिलाशहर अध्यक्षपदी अमृता टिळक तर सचिवपदी किशोरी श्रोत्री यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  असून शहरातील महिला मतदार आपल्याकडे वळविण्यासाठी पक्षाकडून शहरातील महिला पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत आहे.भाजपनेनियुक्तीकेलेल्या दोन्ही महिला पदाधिकारी या उच्च शिक्षित असून त्यांच्या अनुभवाचा पक्षाला नक्कीच फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे.शहरातील महिलांचे असणारे प्रश्न व समस्या या पक्षाच्या माध्यमातून सोडवून शहरातील भाजप पक्ष वाढीसाठी कटिबद्ध असल्याचे यावेळी नवनियुक्त महिलाअध्यक्षा व सचिव यांनी प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश सचिव रवीभाऊ मुंढे,तालुका अध्यक्ष अँड.निलेश रातवडकर,महिला मोर्चा दक्षिण जिल्हाध्यक्षाहेमलता मानकर मॅडम यांच्याहस्ते प्रमिला ए. चोरगेयांचीमहिलामोर्चा तालुकाध्यक्षापदी निवड करण्यात आली व अनिता महेंद्र शिगवण,सुनिता मनोहर चोरगे व श्रीम.शालिनी सांगळे यांची बुथ अध्यक्षा या पदी निवड करण्यात आली.भोईरवाडी येथील संदीप कदम यांनी३आँक्टो  रोजी दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अँड महेशजी मोहिते व गोरेगांव येथीलजेष्ठ कार्यकर्ते नाना महाले यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. यावेळी नगराध्यक्षा रेश्माताई मुंढे तालुका सरचिटणीस विलास ठसाळ, शहर अध्यक्ष सुधीर तळकर,सांस्कृतिक सेल तालुकाध्यक्ष सुभाष मुंढे युवा मोर्चा तालुका सचिव अंकुश सालेकर, युवा मोर्चा शहरअध्यक्ष सुयोग बारटक्के, शक्तीप्रमुख मोरेश्वर गोरीवले, बूथ अध्यक्ष नितीन शिगवण, मुंढ्याची वाडी भोईरवाडी ग्रामस्थ मंडळ व महिला मंडळ,यांसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.तळा नगरपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने कंबर कसली असून नवीन चेहऱ्यांना सामावून घेतले असल्याचे बोलले जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा