म्हसळयातील महिला बचत गटना स्वदेस फाउंडेशनने दाखवला यशाचा मार्ग म्हसळ्यातील बचत गटानी तयार केलेल्या खाद्यपदार्थांची विक्री व प्रदर्शन करुन केली व्यापारी सुरवात
(म्हसळा प्रतिनिधी)
म्हसळा शहरातील अत्यंत मध्यवर्ती ग्रामीण रुग्णालय म्हसळा च्या प्रांगणात स्वदेस फाउंडेशन व पंचायत समिती (एम एस आर एल एम) म्हसळा च्या संयुक्त विद्यमाने महिला स्वयंसहाय्यता बचत गटांनी तयार केलेल्या प्रक्रियायुक्त पदार्थांचे प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले असून महिला स्वयंसहाय्य- ता समूहाचे आर्थिक उत्पन्न वाढावे या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात एकूण नऊ बचत गट सहभागी झाले असून या गटांनी दिवाळी, फराळ,पापड, लोणचे,मसाले अशा पदार्थां चा समावेश होता.याप्रसंगी म्हसळा पंचायत समितीच्या सभापती श्रीमती छाया म्हात्रे, उपसभापती श्री संदिप चाचले गटविकास अधिकारी वाय.एन.प्रभे ,ग्रामीण रुग्णालय आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश मेहता, सांबरे , माजी सभापती महादेव पाटील तसेच स्वदेस फाउंडेशन चे संचालक राहुल कटारिया उपसंचालक तुषार इनामदार, प्रसाद पाटील तालुकाव्यवस्थापक शिवतेज ढऊळ व रवींद्र राऊत या मान्यवरांनी तसेच तालुक्यातील इतर प्रतिष्ठित व्यक्तींनी या प्रदर्शनास भेट दिली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंचायत समिती म्हसळा (एम एस आर एल एम) अभियानाचे तालुका व्यवस्थापक श्री आबा साळवे,प्रभाग समन्व यक गोरठे,स्वदेस फाउंडेशन वरिष्ठ समन्वय क अमोल पाटील व शुभदा सुतार यांनी विशेष परिश्रम घेतले.या उपक्रमाचे तालुक्यातून सर्वत्र कौतुक होत असुन अशी संधी मोठ्या प्रमाणात मिळावी अशी अपेक्षा स्वयं सहाय्यता समुहांकडुन होत आहे.
"स्वदेस फाउंडेशन व पंचायत समिती (एम एस आर एल एम) म्हसळा च्या संयुक्त विद्यमाने आमच्या उत्पादनाला अत्यंत मध्यवर्ती जागी प्रदर्शन भरवून विक्रीसाठी मदत झाली"
बचतगट काळसुरी.
"स्वदेस फाउंडेशन तालुक्यात शिक्षण, आरोग्य, कोव्हीड 19 चे तसीकरण,पाणी पुरवठा, स्वच्छतेचे विविध उपक्रम या सर्वच बाबतीत सामाजिक बांधीलकी समजून म्हसळा कराना मदत करते हे कौतुकाचे व स्त्युत्य आहे".
छायाताई म्हात्रे, सभापती पं.स. म्हसळा
Post a Comment