पालकांनी त्यांच्या मुलांच्या सुप्त कलागुणांसाठी वेळ व प्रोत्साहन देणे आवश्यक - पालकमंत्री कु.आदिती तटकरे



म्हसळा प्रतिनिधी
सध्याच्या परिस्थितीत लहानपणापासूनच मुलांवर अभ्यास आणि स्पर्धेचे ओझे वाढत चालले आहे. मात्र  मुलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी पालकांनी आपल्या मुलांसाठी शिक्षणाबरोबरच त्यांच्यातील कला,क्रीडा आणि इतर सुप्त गुणांच्या विकासासाठी वेळ व प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री कु.आदिती तटकरे (Guardian Minister Aditi Tatkare)  यांनी आज म्हसळा येथे केले. 
       म्हसळा क्रीडा संकुल येथे चँपियन कराटे क्लबने आयोजित केलेल्या जिल्हा स्तरीय स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या वेळी ताई बोलत होत्या.
      यावेळी जेष्ठ नेते अलीशेट कौचाली, समीर बनकर, जिल्हा परिषद पशुसंवर्धन सभापती बबन मनवे, सभापती छाया म्हात्रे, उपसभापती संदीप चाचले, प्रांता धिकारी अमित शेडगे, तहसिलदार समीर घारे, सहा.पोलीस निरीक्षक उध्दव सुर्वे, माजी सभापती नाझीम हसवारे, माजी सभापती उज्वला सावंत,नगराध्यक्षा जयश्री कापरे,उपनगराध्यक्ष सुबान हलदे,अंकुश खडस, स्पर्धा आयोजक अभय कलमकर, मनोहर तांबे, संतोष उद्गरकर, खांडेकर यांची उपस्थिती होती.

      पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आजच्या काळात अभ्यास, कला, क्रीडा क्षेत्राबरोबरच स्वरक्षणासाठी  कराटेसारख्या बाबीचीही नितांत गरज निर्माण झाली असल्याचे सांगितले. या जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत लहान-लहान मुलामुलींनी कराटे खेळातील सुंदर प्रात्यक्षिक दाखवून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. याबाबत या मुलामुलींचे कौतुक करताना पालकमंत्री कु. तटकरे यांनी स्पर्धा आयोजकांनाही शुभेच्छा दिल्या. विशेषतः लहानपणीच मुलींना कराटे या खेळातून स्वसंरक्षणाची कला आत्मसात होण्याबाबतचे महत्त्व त्यांनी याप्रसंगी विषद केले. 
       खासदार सुनिल तटकरे आणि पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या विशेष प्रयत्नातून म्हसळा सावर येथे उभारण्यात आलेल्या तालुका क्रीडा संकुलाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. अवघ्या तीनच महिन्यापूर्वी या क्रीडा संकुलाचे लोकार्पण झाल्यापासुन या क्रीडा संकुलात क्रीडाप्रेमी नागरिक,विद्यार्थी, बॅडमिंटन, कराटे अशा विविध प्रकारच्या खेळांचा सराव करीत असून येथे मोठया क्रीडा स्पर्धांचेही आयोजन केले जात आहे, हे पाहून मनाला मोठा आनंद मिळत असल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री कु.तटकरे यांनी यावेळी काढले.
       त्या पुढे म्हणाल्या, देशात कराटे स्पर्धांचे नाव उज्वल करणारे मुख्य प्रशिक्ष क संतोष मोहिते हे करोनाच्या प्रादूर्भावाने आजारी असून त्यांचे हैदराबाद येथे उपचार सुरू  आहेत. त्यांना मदत करण्यासाठी आयोजकांनी आज या जिल्हास्तरीय कराटे स्पर्धांचे आयोजन केले असले तरी शासन स्तरावरही कराटे प्रशिक्षक संतोष मोहिते यांच्या उपचारासाठी सर्वतोपरी प्रयत्न निश्चितच करू असेही आदीती ताईनी सांगितले
       या कार्यक्रमास जिल्ह्यातील कराटे स्पर्धक, पालक, प्रशिक्षक तसेच क्रीडाप्रेमी नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.पालकमंत्री कु.तटकरे यांच्या आजच्या म्हसळा तालुक्याच्या नियोजित दौऱ्यावेळी त्यांच्या हस्ते म्हसळा नगरपंचायत हद्दीतील अंतर्गत रस्ता व  गटार बांधकामाचे उद्घाटन आणि घोणसे ग्रामपंचायतीमधील वडाची वाडी,म्हशाची वाडी येथील मंजूर अंतर्गत रस्ता बांधकामाचे तसेच ग्रामपंचायत इमार तीचे भूमीपूजनही संपन्न झाले.

फोटो. जिल्हास्तरीय कराटे स्पर्धत सिल्व्हर व ब्रांझ पदक विजेता स्वराज संतोष उध्दरकर याचे कौतुक करताना पालकमंत्री आदीती तटकरे .

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा