संजय खांबेटे : म्हसळा
कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे कुटुंबातील नातेवाईकाना रु ५० हजार आर्थिक अनुदान मिळणार आहे.मृत व्यक्तीच्या मृत्यू प्रमाण पत्रांत मृत्यूचे कारण स्पष्टपणे लिहीलेले असणे आवश्यक असल्याचे सर्वोच्च न्याया लयाने आपल्या निर्णयात म्हटलेआहे. रुग्णा ची चाचणी झाल्यावर टेस्ट पॉझीटीव्हआली व रुग्ण घरी किंवा हॉस्पीटलला मृत्यू झाला आसल्यास आशाच रुग्णाचा दाखला किंवा मृत्यू प्रमाण पत्रावर कोरोना मुळे मृत्यूआसा स्पष्ट उल्लेख आसणे आश्यक आहे.टेस्ट पॉझीटीव्ह आली आणि त्यानंतर उपचार सुरु असताना रुग्णाचा घरी किंवा हॉस्पीटल मध्ये मृत्यू झाला आशा लोकानाच ही मदत मिळणार आहे. टेस्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर अपघात,विषबाधा ,आत्महत्या किंवा इतर कोणत्याही प्रकारे मृत्यू झाल्यास तो मृत्यू कोरोनामुळे गृहीत धरला जाणार नाही असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. मदती साठी कोरोनात मृत्यु पावलेल्या व्यक्तीचे मृत्यूप्रमाण पत्र,आधारकार्ड,नातेवायीकाचे आधार कार्ड आर्जासोबत लागणार आहे, विहीत नमुन्यातील आवश्यक सर्व कागद पत्रांसह अर्ज केल्यास ३० दिवसा पर्यंत अनुदान मिळू शकते .अनुदान हे लाभार्थी नातलगाच्या बँक खात्यांत जमा होणार आहे. त्यामुळे नातलगांचे आधारला बँक खाते लिंक असणे आवश्यक आहे.
अर्ज कुठे करायचा?
अर्ज जिल्हा प्रशासन किंवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे मिळेल.मृताचे नातलगानी अर्ज भरायचा आहे.
अर्जासोबत १)मृत्यूचा दाखला २)मृत्यू झालेल्या व्यक्तीचे आधार कार्ड ३) ज्याना मदत मिळणार आहे त्यांचे आधार कार्ड
म्हसळा तालुक्यातील एकूण ५४ व्यक्ती कोरोनामुळे मृत झाल्याची माहीती तालुका आरोग्य आधिकारी यानी दिल आहे. गाव निहाय संख्या पुढील प्रमाणे म्हसळा शहर १४, मेंदडी ५,पाभरे ४, खरसई,निगडी वरवठणे प्रत्येकी ३, खामगाव,संदेरी प्रत्येकी २, दुर्गवाडी, वारळ, गोंडघर, भेकऱ्याचा कोंड, बंडवाडी, मेंदडी कोंड, वाडांबा, चिखलप, मांदाटणे, रोहीणी, खामगाव गौळवाडी, पांगाळोली, आगरवाडा, तोंडसुरे,आंबेत,सकलप, देवधर कोंड,कुडतोडी या गावातील प्रत्येकी १ कोरोना रुग्ण दगावल्याचे तालुका आरोग्य आधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले.
"कोव्हीड - १९ या विषाणूचा प्रार्दूभाव
रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्याप्रशासनाने आधिकाराचे तालुका पातळीपर्यंत विकेंद्रीकरण केले होते यामुळे कोव्हीड - १९ चे बऱ्यापैकी राज्यात नियंत्रण झाले , शासनाने मृतांचे नातलगाना द्यायचे अनुदान अर्जही तालुका पातळीवर वितरण व संग्रहीत करावे"
महादेव पाटील तालुका प्रमुख म्हसळा
Post a Comment