म्हसळा तालुक्यात सुधारीत सातबाऱ्या चे पाहिले वाटप पाभऱ्यात : पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते होणार वाटप




संजय खांबेटे : म्हसळा 
सुधारित सातबारा उताऱ्याची पहिली प्रत थेट खातेदाराच्या हातात देण्याचा राज्याचे महसूल विभागाचा मोठा निर्णय आहे.रायगडच्या पालक मंत्री कुमारी आदीती तटकरे यांच्या हस्ते म्हसळा तालुक्यातील पाभरे येथे उद्या शनी. दिं.२ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वा. होणार असल्याचे तहसीलदार समीर घारे यानी कळविले आहे.गांधी जयंती २ऑक्टोबर पासून  या सुधारित सात बारा उताऱ्याची पहिली प्रत मोफत थेट खातेदाराच्या हातात देण्याच्या या महत्व पूर्ण निर्णयात पालकमंत्री तटकरे यांचा सहभागआहे. महसूल विभागाने सातबारा उताऱ्यात नाविन्यपूर्ण बदल केले आहेत.तो सातबारा उतारा ऑन लाईनही उपलब्ध करून देण्यात आला. हा आधुनिक सातबारा उतारा शेतकऱ्यां ना समजण्यास सोपा आणि बिनचूकही रहाणार आहे.खातेदारांना सातबारा उताऱ्याचे हे आधुनिक स्वरूप माहित व्हावे यासाठी हा सातबारा उतारा थेट खातेदारांना घरपोच मोफत (Free Cost) देण्याचा महत्वाकांक्षी निर्णय शासनाने घेतला आहे.



"शेतकरी खातेदारांना थेट मोफत आणि घरपोच सातबारा उतारा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य ठरले आहे". "महसूल विभागातील कोतवाल, तलाठी,मंडळआधिकारी यांच्या माध्यमा तून तालुक्यात ही विशेष मोहीम गांधी जयंती अर्थात दोन ऑक्टोबर पासून सुरू करणार, तालुक्यात २७ हजार १०६ खातेदाराना ४६ हजार १३८खाते उतारे थेट शेतकऱ्यांच्या आणि खातेदा राच्या प्रातिनिधीक स्वरुपांत पालकमंत्री आदीती तटकरे यांच्या हस्ते हातात देऊन आम्ही हा नव्या स्वरूपा तील सातबारा उतारा अधिक लोकाभिमुख करणार आहोत."
-डी.जे.पाटील.नायब तहसीलदार महसुल. म्हसळा.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा