श्रीवर्धन : दिवेआगर समुद्रकिनारा पर्यटकांनी बहरला


बोर्लीपंचतन (अभय पाटील) : 4 महिने पावसाच्या दमदार बॅटींगनंतर श्रीवर्धन तालुक्यातील समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजून गेले आहेत. दिवेआगर समुद्र किनाऱ्याला पर्यटकांची पसंती असल्याने विकेंडच्या सुट्टीनिमित्ताने शनिवार (२ ऑक्टोबर) पासून हा किनारा पर्यटकांनी बहरुन गेला आहे.

सर्व हॉटेल्स, लॉजिंगदेखील फुल असून अनेक महिन्याच्या कालावधीनंतर पर्यटन व्यवसाय जोरात सुरू झाल्याने व्यावसायिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. कोरोना, त्यानंतर पाऊस याबरोबरच मागील चार महिन्यामध्ये जनतेने अतिवृष्टी, ढगफुटी, पूर, महापूर अशा बाबींचा सामना केला. आता गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावानंतर पाऊस गायब झाला आहे. त्यामुळे पर्यटक समुद्र किनारी वळले आहेत.


यामध्ये दिवेआगर समुद्रकिनारा तर पर्यटकांनी गजबजला आहे. त्यामुळे या परिसरातील पर्यटनाशी संबंधित व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.


Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा