तळा:किशोर पितळे
तळातालुका सेवा निवृत्तकर्मचारी संघटनेची सर्व साधारण सभा जेष्ठ सभासद मारूती शिर्के गुरुजी यांच्या निवासस्थानी १०आँक्टो रोजी संपन्न झाली. या सभेला बहुसंख्य सदस्य उपस्थित होते.गेल्या वर्षभर कोरोना महामारीचे संकटअसल्याने शासनाच्या आदेशाचे पालनकरून सभा घेण्यात आली नव्हती. राज्य संघटनेच्यापरवानगीनेभरविण्यातआली.यावेळी दिवंगत सदस्य व नातेवाईक,माजी सैनिक यांना श्रद्धांंजली वाहण्यातआली. वर्षभरापासून संघटनेच्या प्रलंबित समस्यांची माहिती,उपाययोजना कार्यवाहीचा आढावा त्याचबरोबर राज्य सरकारच्या महागाई भत्ता पेन्शनची नियमावली अध्यक्ष भानू स. मंचेकर गुरूजी यांनी विषद केली.व नवीन सदस्य नामदेव तांबडे गुरुजी श्रीमती रातवडकर यांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन करण्यात आले.तसेच जिल्हा परिषदेच्याआदर्श शिक्षक पुरस्कार (माध्यमिक)मनोज भाऊ सुतार यांचा विशेष सन्मान शाल श्रीफळ गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले.जेष्ठ सदस्य मारूतीशिर्के गुरुजीयांचा ८०वा. वाढदिवस सपत्नीक,श्रीफळ गुलाब पुष्प देऊन साजरा करण्यात आला.प्रस्तावना वस्वागत मागील सभा इतिवृत्त सचिव जनार्दन वडके यांनी केले आभार प्रदर्शन अनंत वारे यांनी केले.
Post a Comment