(म्हसळा प्रातिनिधी)
आज म्हसळा तालुक्यात १४६० श्री गणपतींचे व १६२ गौरींचे वाजत गाजत, फटाकांच्या आतषबाजीत, गणपती बाप्पा मोरया च्या गर्जनेत विर्सजन करण्यात आले.आज विर्सजन होणारे सर्वच गणपती खाजगी असल्याने मा. जिल्हा धिकारी व मा.जिल्हा पोलीस अधिक्षक रायगड यांचे नियम व निर्देशा प्रमाणे बहुतांश भाविकानी नियमांचे पालन करीत विसर्जन उत्साहात केले.तालुक्यात बहुतांश गावातून खाडी,नदी,तळी,मोठे ओहोळाचे पात्रात, ग्रामपंचायतीने बांधलेले विसर्जन घाटावर व विहीरीतून श्रीचे व गौरींचे विसर्जन करण्यात आले. म्हसळा पोलीस स्टेशनचे सपोनी उध्दव सुर्वे यानी २ आधि- कारी व २५ कर्मचाऱ्यांचा विसर्जनसोहळया चे कार्यक्रमासाठी बंदोबस्त लावला होता.
Post a Comment