म्हसळ्यातील शेतकरी -नागरीक अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीच्या प्रतिक्षेत.


संजय खांबेटे : म्हसळा
म्हसळा तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ३५०० मि.मि.असून आजपर्यंत ३८२० मि.मि.पावसाची नोंद झाली आहे.जून ते सप्टेंबर या कालावधीत तालुक्यात झालेले पर्जन्यमान यावेळी सोसाट्याचा वारा-वादळ या सोबत झाल्याने घर, गोठे यांच्या पडझडी झाल्याची माहिती महसुल विभागाकडून समोर येत आहे.या वर्षी शेती- फळबागायतींची नुकसान सोडून तालुक्यातील अनेक गावांतून ३५ लाभार्थांचे सुमारे रु१० लक्ष ८८ हजार२६५ रक्कमेचे आर्थिक नुकसान झाले आहे.तालुक्यातील नागरिकाना मदतीची अपेक्षा असून शासनाकडून अद्यापही कोणत्याही सकारात्मक हालचाली दिसत नाही. तालुक्यातील म्हसळा, घोणसे, गणेश नगर ,सुरई, काळसुरी, मेंदडी,कुडगांव, पेढांबे, वारळ, कांदळवाडा, संदेरी, आगर वाडा, साळविंडे, सोनघर, तुरूंबाडी, दुर्गवाडी, तोंडसुरे (जंगमवाडी), पांगळोली या महसुली गावांतील ३५ लाभार्थींचे सुमारे रु१० लक्ष ८८ हजार२६५ रक्कमेचे आर्थिक नुकसान झाल्याचे महसुली पंचनामे झाले आहेत.बहुतांश लाभार्थींचे छतावरील कौले- कोने, सीमेंट व स्टीलचे पत्रे,वासे,पडवी,भिंत अति पावसाने कोसळल्याच्या घटना घडल्याचे विविध ग्रामस्थानी सांगितले.

" हवामानातील बदलामुळे ग्रामिण भागांतील शेतकरी ग्रामस्थांचे मागिल २-३ वर्षांत निर्सग व तोक्के वादळ, 
कोव्हीड १९ मुळे आलेली आर्थिक मंदी यामुळे शासनाने तात्काळ मदत करावी"
महादेव पाटील, माजी सभापती पं.स. म्हसळा.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा