मनसेवृत्तांत, नवी मुंबई : मागील १३ वर्षापासून मुंबई गोवा महामार्गाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असून मागील काही वर्षात दोन ते अडीच हजार नागरीकांचा अपघाती मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रस्ते व आस्थापना विभागाचे कार्याध्यक्ष योगेश चिले यांच्या नेतृत्वात मुंबई गोवा महामार्ग पाहणी दौरा करण्यात आला होता. या दौऱ्यामध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी महामार्गाच्या दुरावस्थेची पोलखोल करून विडिओ बनवले होते. आता त्यांनी कोकण भवन येथे सार्वजनिक बांधकाम खात्याचे (राष्ट्रीय महामार्ग विभाग) वरिष्ठ कार्यकारी अभियंता श्रीमती तृप्ती नाग व उपमुख्य अभियंता श्री. बांगर व यांची भेट घेऊन त्यांच्या समोर महामार्गावरील समस्येचा पाढा वाचला व या बांधकामात १७०० कोटीच्या भ्रष्टाचाराचे आरोप योगेश चिले यांनी केले.
तसेच गणेशोत्सव काळात मुंबईतून मोठ्या प्रमाणावर चाकरमानी कोकणातील गावी जात असतात.
जुलै महिन्यात अतिवृष्टी आणि पूर स्थितीमुळे नुकसान झालेल्या महामार्गांची तातडीनं दुरुस्ती व महामार्गावर गरज असेल तिथे दिशादर्शक फलक लावण्याची मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली. जे चाकरमानी राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वरून (मुंबई-पुणे एक्सप्रेसवे)कोकणात जातील त्यांना कोल्हापूरपर्यंत संपूर्ण टोल माफीची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली. त्याप्रसंगी मनसे उपाध्यक्ष संजय जामदार, रस्ते आस्थापना सरचिटणीस विजय जाधव, उपाध्यक्षा सुनिता चुरी, उपाध्यक्ष नंदू घाडीगांवकर, उपाध्यक्ष बाबासाहेब अवघडे, मनसे रायगड जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड, संदिप गलुगडे, मनीष पाथरे, संजय तन्ना, तानाजी पिसे, रोहन आक्केवार, सौ. पुजा कदम, ओम लोके मनसेच्या वतीने उपस्थित होते.
Post a Comment