वडवली मध्ये संत निरंकारी मिशनच्या वतीने रक्तदान शिबिर



खरसई :- प्रसाद पारावे
आध्यात्मिक जनजागृती बरोबर सामाजिक बांधिलकी तत्परतेने जोपसण्याचे महान कार्य संपूर्ण वैश्विक स्तरावर संत निरंकारी मिशनच्या विद्यमान सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपा छत्र छायेखाली अविरतपणे सूरू आहे. यामध्ये रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, नैसर्गिक आपत्कालीन परिस्थितीत मदत कार्य, सध्याच्या कोवीड-१९ परिस्थितीमध्ये मदत कार्य इत्यादी समाजोपयोगी कार्ये मानवतेच्या दृष्टीकोनातून अविरतपणे सूरू आहे.

रायगड झोन 40 (ए) झोनल प्रमूख प्रकाश म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली  वडवली येथील निरंकारी भवनमध्ये  सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत रक्तदान शिबिर पार पडले. या शिबिरात 55 निरंकारी महापुरुषांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत रक्तदान केले. हे शिबिर शासनाच्या नियमांचे पुर्णपणे पालन करून मंडळाच्या आदेशान्वये पार पडले. या शिबिराचे उद्घाटन म्हसळा येथील जेष्ट महात्मा हिरामण चव्हाण यांच्या शूभहस्ते झाले. यामध्ये प्रामुख्याने अलिबाग येथील रायगड जिल्हा शासकीय रक्तकेंद्र यांचा सहभाग मोलाचा ठरला. रक्तपेढीचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. दिपक गोसावी,  चेतना वर्तक, पूनम पाटील तसेच फरीद अफवारे या वेळी उपस्थित होते. सदरचे शिबीर व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी वडवली शाखेचे मुखी गणेश नाक्ती, सेवादल संचालक दत्तात्रेय नाक्ती, खरसई सेवादल संचालक तुकाराम मांदाडकार, महिला अधिकारी अंजली पेरवे, सीमा किलंजे, सेवादल, सेवादल भगिनी यांनी विशेष परिश्रम घेतले आहे. सध्या कोरोनामुळे रक्ताचा तुटवडा भासत असून या परिस्थितीत रक्तदान शिबिर आयोजित करून संत निरंकारी मिशनच्यावतीने बांधीलकी जोपासण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा