म्हसळा (बाबू शिर्के)
म्हसळा काँग्रेस चे अध्यक्ष डॉ मोईज शेख यांची महाराष्ट्र काँग्रेस सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या मान्यतेने काँग्रेसचे महासचिव खासदार के.सी वेणूगोपाल यांनी महाराष्ट्र काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा केली. म्हसळा तालुक्यात काँग्रेस जिवंत ठेवण्यात डॉ मोईज शेख यांचा सिंहाचा वाटा आहे.अत्यन्त प्रतिकूल परिस्थितीत काँग्रेस चा झेंडा कसा फडकत राहील याची वेळोवेळी त्यांनी दक्षता घेतली. तसेच जिल्हा परिषद निवडणूक, ग्रामपंचायत निवडणूक स्वबळावर लढवून म्हसळा तालुक्यात काँग्रेसचा मतदार जागृत केला.वेळोवेळी मोर्चे, आंदोलने काढून प्रशासना विरोधात वातावरण तयार केले, नेहमी पक्ष व पक्ष श्रेष्ठीं शी विश्वासपूर्ण राहून पक्षासाठी भरीव कार्य केल्या मुळे त्यांची निवड या महत्त्वाच्या पदावर करणेत आली असे विश्वसनीय रित्या कळते.त्यांची निवड झाल्याबद्दल म्हसळा तालुका काँग्रेस कमिटी कढून त्यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार कार्यक्रमप्रसंगी डॉ मोईज शेख यांनी बोलताना आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुक आणी नगरपंचायत निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार असे सांगितले.राष्ट्रवादीने काँग्रेसचा वापर फक्त मतांसाठी केला.त्यांनतर कधी काँग्रेसला विचारात सुद्धा घेतला नाही.त्यामुळे राष्ट्रवादीला बाजूला सारून म्हसळा तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्हा कॉंग्रेसमय करणार असल्याचे सुद्धा डॉ शेख यांनी सांगितले.म्हसळा तालुक्यातील बेरोजगारी, आरोग्य व्यवस्था, रस्ते सुधारण्यात भर देणार असल्याचे शेवटी बोलताना डॉ शेख यांनी सांगीतले. या सत्कार कार्यक्रम प्रसंगी म्हसळा तालुका काँग्रेस सरचिटणीस रवी दळवी, शहराध्यक्ष बाबा हुर्जूक, युवक शहराध्यक्ष सुफीयान हळदे, महिला शहराध्यक्ष नाझीमा मुकादम आणी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment