संजय खांबेटे : म्हसळा
म्हसळा तालुक्यात शुक्र .दि.१६ पासून आज रवी. दि.१८पर्यंत पावसाची संततधार सुरु आसून तालुक्याचे आज पर्यत पर्जन्य मान एकूण २१०८ मि.मी. झाले आसल्याचे नायब तहसीलदार के.टी. भिंगारे यानी सांगितले.मागील तीन दिवसांत ९२मि.मी. सरासरीने पाऊस पडला असून आत्तापर्यंत सरासरी पर्जन्य मानाचे ६०% पर्जन्यमान झाले आहे.रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत 19ते 21 जुलैदरम्यान मुसळधार पाऊस तेअतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तालुक्यातील अनेकभागांमध्ये पावसानं झोडपलं आहे. कोकणात येत्या चार ते पाच दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर काही ठिकाणी अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याची माहिती हवामान खात्याच्या शुभांगी भुते यांनी दिली आहे.
कोकण आणि मध्य महाराष्ट्रातअतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. अरबी समुद्राचे महाराष्ट्र ते कर्नाटक किनारपट्टीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे पुढील 5 ते 6 दिवस पावसाचा जोर कायम राहील असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे.
Post a Comment