महाड व पोलादपूर तालुक्यात पूर, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती
टीम म्हसळा लाईव्ह
दि. 22 जुलै 2019 रोजी रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने महाड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात नद्यांना पूर येऊन अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळीत वाढ झाली व डोंगराळ भागात जमिनीचे भूस्खलन झालेले आहे. महाड तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पूर,अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करणे आवश्यक आहे. जेणेकरून नुकसानग्रस्तांना आवश्यक ती मदत करता येईल. मात्र महाड शहर तसेच आजूबाजूची गावांना देखील पुराचा तडाखा बसल्याने पूरग्रस्त क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे पंचनामे तातडीने करण्याकरिता ज्यादा मनुष्यबळाची आवश्यकता असल्याने या कामी रायगड जिल्ह्यातील इतर तालुक्यातील खालीलप्रमाणे तलाठी व लिपिक अव्वल कारकून आदी कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे करण्यात आली आहे.
महाड तालुक्यासाठी उरण तलाठी-8 महसूल सहाय्यक/अव्वल कारकून -2, पनवेल तलाठी 8 महसूल सहाय्यक/ अव्वल कारकून-2, पेण तलाठी-8 महसूल सहाय्यक/अव्वल कारकून-2, खालापुर तलाठी-6, महसूल महसूल सहाय्यक/ अव्वल कारकून-2, कर्जत तलाठी-8, महसूल सहाय्यक/ अव्वल कारकून-2, अलीबाग तलाठी-8, महसूल सहाय्यक/ अव्वल कारकून-2, श्रीवर्धन तलाठी-6, महसूल सहाय्यक/ अव्वल कारकून-2, म्हसळा तलाठी-6, महसूल सहाय्यक/ अव्वल कारकून-2, मुरुड तलाठी-6, महसूल सहाय्यक/ अव्वल कारकून-2.
पोलादपूर तालुक्यासाठी रोहा तलाठी-8, महसूल सहाय्यक/ अव्वल कारकून-2, सुधागड तलाठी-6, महसूल सहाय्यक/ अव्वल कारकून-2, तळा तलाठी-5, महसूल सहाय्यक/ अव्वल कारकून-2, असे एकूण 83 तलाठी व 24 महसूल सहाय्यक अव्वल कारकून यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत
पूर परिस्थितीमुळे महाड शहर व आजूबाजूची पुराने बाधित झालेल्या गावातील नुकसानीचे पंचनामे व त्या अनुषंगिक कामे करण्याकरिता कर्मचारी वर्गाची नेमणूक करण्यात आली आहे. सर्व तहसिलदार यांनी तलाठी महसूल सहाय्यक, अव्वल कारकून यांनी आधी कर्मचाऱ्यांचे नावासह आदेश काढून संबंधितांना दि. 26 जुलै 2021 रोजी सकाळी 11 वाजता पर्यंत नेमणूक दिलेल्या तालुक्यामध्ये संगणक, लॅपटॉप, प्रिंटर व स्टेशनरी आदी साहित्य तसेच आठ दिवस मुक्कामी जाण्याच्या तयारीत उपस्थित राहण्याबाबत सूचित करावे. हे साहित्य तहसिलदार यांनी तात्काळ उपलब्ध करून द्यावे सर्व संबंधित कर्मचारी हे उपविभागीय अधिकारी महाड यांच्या मार्गदर्शनाखाली महाड, पोलादपूर तालुक्यासाठी त्यांनी नेमून दिलेले कामकाज करतील. हा आदेश संबंधित तात्काळ बजावण्यात येऊन संबंधितास नेमून दिलेल्या ठिकाणी तात्काळ हजर राहण्यास कळवावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी रायगड अलिबाग जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड-अलिबाग श्रीमती निधी चौधरी चौधरी यांनी दिले आहेत.
Post a Comment