महाड तालुक्यातील तळीये येथे आरोग्य विषयक कामकाजासाठी वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती
टीम म्हसळा लाईव्ह
महाड तालुक्यातील तळीये गाव दि.22 जुलैला अतिवृष्टीमुळे दरड कोसळून उद्ध्वस्त झाले होते. दरडीच्या ढिगाऱ्यातून 53 मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्या ठिकाणी आरोग्य विषयक कामकाजासाठी महाड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य पाचाड, वरंध, बिरवाडी, विन्हेर, चिंभावे तर पोलादपूर तालुक्यातील पाटीलवाडी व पळचिल प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी,कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दरडीच्या ढिगाऱ्यातून काढण्यात आलेल्या शवांचे तात्काळ शवविच्छेदन करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र तळा येथील डॉ.अमोल बिरवटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तळीये येथे आरोग्य विषयक कामकाज करण्यासाठी त्यांना पालकमंत्री कु.आदिती तटकरे, जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, आरोग्य उपसंचालक डॉ.गौरी राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन मिळत आहे.
Post a Comment