आम्ही नुकतेच महाड येथे पूरग्रस्तांना मदतरुपी भेट देऊन आलो असता, आपणास सविनय विनंती करतो आहे की,
महाड-पोलादपूर येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरस्थितीमुळे महाड- पोलादपूर तालुक्यातील बऱ्याच गाव वाड्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. इतर नुकसान आहेच परंतु अत्यंत गरजेची बाब म्हणून
नागरिकांना खायला धान्य राहिले नाही सगळं काही साठवण केलेले धान्य पावसात पुराच्या पाण्याने भिजून गेलं आहे. त्यामुळे खूपच आबाळ होत असून आपणास अथवा आपल्या मित्र-परिवारास,नातेवाईकांस आम्ही विनंती करतो आहोत की, यथाशक्ती शक्य असल्यास आपल्या परीने काहीही मदत मिळाल्यास खूपच बरं होईल.
शशिकांत (बाबू) शिर्के
सतिश शिगवण
निकेश कोकचा
किरण कि. पालांडे
महेश घोले
मदत म्हणून देता येण्यासारख्या वस्तु
१) मेणबत्ती किंवा बॅटरी 🔦
२) बिस्कीट
३) तयार जेवण (पुलाव इ.) फरसाण
४) सीलबंद दूध
५) पाणी बॉटल
६) मच्छर अगरबत्ती
यापैकी जे काही आपणास शकय असल्यास कृपया मदत करावी.
धन्यवाद💐
टीप:- म्हसळा धावीरदेव मंदिर येथे एक पिक-अप वाहन उभे करण्यात येईल. तिथे आपणाकडून आलेली वस्तूरुपी मदत स्वीकारली जाईल. वेळ 11 - 12
Post a Comment