म्हसळा तालुक्यात जनकल्याण संस्थेमार्फत रुग्णसेवा केंद्र सार्वजनिक वाचनालय म्हसळा येथे सुरू असून जनकल्याण संस्था रायगड कडून कोरोना बाधीत रुग्णांच्यासेवेसाठी दोन ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर दाखल झाले आहेत, रुग्णसेवा केंद्रामधन गरजू रुग्णाना कॉट,व्हिल चेअर, वॉटर बेड,एअर बेड, ट्रॅक्शन किट,टॉयलेट चेअर विविध साईजच्या कुबडया, नेब्यु- लायझर इत्यादी साहीत्याच्या माध्यमातून रुग्णसेवा सुरु आहे. राज्यात सर्वत्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आसताना ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटरची सेवा सुरु झाल्याने कोरोना संक्रमित रूग्णांना घरच्याघरी ऑक्सिजन पातळी व्यवस्थित ठेवण्यासाठी या मशीनचा चांगला उपयोग होणार आहे.
ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर नक्की काय काम करतो (Oxygen Concentrator)
"कॉन्सेंट्रेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे .
हवेमध्ये सर्वसाधारणपणे 78 टक्के नायट्रोजन आणि 21 टक्के ऑक्सिजन वायू असतो आणि बाकीच्या वायूंचे प्रमाण केवळ 1 टक्का आहे.ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मध्ये ही हवा आत घेतली जाते आणि नंतर ते फिल्टर होते आणि नायट्रो जन परत हवेत सोडले जाते. या प्रक्रियेद्वारे कॉन्सेंट्रेटरमध्ये वापरल्या जाणार्या ऑक्सिजनचा उपयोग करून रुग्णाच्या ऑक्सिजनची कमतरता पूर्ण केली जाते, म्हणूनचऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर हा कोरोना बाधीत व बरे होणाऱ्या रुग्णांसाठी वरदान ठरतो , अनेक वेळा रुग्णाचा जिवही वाचतो"
संपर्क .
संजय खांबेटे, Mob 8668500762.
Post a Comment