श्रीवर्धन प्रतिनिधी :- तेजस ठाकूर
सध्या रायगड जिल्ह्यात बाजारपेठेची वेळ वाढवल्याने नागरिकांची गर्दी अगोदरच्या वेळेपेक्षा आता कमी असल्याचे दिसून येते. नागरिकांनी मान्सून पावसाळ्याचे काम हाती घेतल्याने त्यांना बांधकामाच्या वस्तू व तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंसाठी बाजारात यावे लागते. सध्या नागरीक छत्री, रेनकोट तसेच ताडपत्री अशा वस्तू घेण्यात व्यस्त झालेले आहेत.
दवाखाने व औषधांच्या दुकानांची वेळ वगळता बाजारपेठ व इतर दुकानाची वेळ सकाळी ७ ते दुपारी २ अशी वेळ ठरवून देखील दुचाकीस्वार व इतर नागरिक हे सायंकाळी विनाकारण बाहेर पडत असतात. ही बाब श्रीवर्धन पोलीस ठाणे यांनी लक्षात घेता त्यांनी सायंकाळच्या वेळेत विनाकारण फिरणाऱ्यांवर कोरोना चाचणी केली. ही चाचणी २२ व्यक्तींवर करण्यात आली व त्यातून एक व्यक्ती कोरोना बाधित रुग्ण असल्याचे आढळून आले.
श्रीवर्धन पोलीस ठाणे कडून हे अनोखी कार्य श्रीवर्धन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आले. यावेळेस पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर,उप पोलीस निरीक्षक उमेन्द्र खिराड त्यासोबत गणेश आठरे व इतर कर्मचारी उपस्थित होते.
Post a Comment