जिल्हापरिषदेच्या उपक्रमाचे म्हसळयात कौतुक
(म्हसळा प्रातिनिधी)
म्हसळा तालुक्यातील महिला बचत गटाना जि. प. सेस फंड योजनेअंतर्गत भाजीपाला मिनीकिट्स वाटप रायगड जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती बबन मनवे यांच्या हस्ते करण्यात आले .पंचायत समिती म्हसळा येथील सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला पंचायत समितीच्या सभापती छाया म्हात्रे,उप सभापती संदीप चाचले पं.स.सदस्य श्रीमती उज्वला सावंत व मधुकर गायकर,गट विकास अधिकारी वाय. एम्. प्रभे ,सहाय्यक गट विकास अधिकारी राजेश कदम,इंदुलकर, हेमंत माळी ग्रामपंचायत विस्तार आधिकारी सुनिल गायकवाड,अशोक बाक्कर व शिवाजी शिंदे सरपंच अनिल बसवत यावेळी तालुक्यातील एकुण महिला बचत गट ४६८ पैकी २५ बचतगटांना मिनीकिट्स वाटप केले त्यामध्ये तोंडसुरे, वरवठ्णे, रेवली, खामगाव, खारगाव बु., पाभरे, काळसुरी, मेंदडी, चिखलप, तोराडी, देवघर व निगडी येथील महिला बचत गटाच्या प्रतिनिधी उपस्थित होत्या. यावेळी सरपंच, उपस्थित मान्यवरानी म्हसळयाचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आणि कृषी व पशुसंवर्धन सभापती बबन मनवे याचा आभ्यासू व कल्पकतेतून जिल्हा परिषद सेस फंड योजने अंतर्गत जिल्हयातील बहुतांश महिला बचत गटांना १००% अनुदानातुन भाजीपाला मिनी किट्सचे वाटप करण्यात आल्या,आता जिल्ह्यां तील माहिला बचत गट गावासाठी लागणारी भाजी गावातच निर्मिती करणार ह्याचे श्रेय सभापती बबन मनवेना जाणार असल्याचे यावेळी आवर्जुन सांगितले. एच. एम्. परकाळे विस्तार अधिकारी सांख्यिकी यांनी प्रास्ताविक केले. मंगेश साळी कृषी अधिकारी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
"जिल्हा परिषद सेस फंड योजने अंतर्गत चालू आर्थिक वर्षात नाविन्यपूर्ण उपक्रमातून भाजी पाला मिनी किट्सचे वाटप करण्यात आले, बचत गटानी आपले विविध उत्पादनशील व्यवसाय सांभाळत नवीन कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त भाजीपाला पिकवावा आणि भाजीपाला लागवड या cash crop कडे वळावे "बबन मनवे, सभापती, कृषी व पशुसंवर्धन रा.जि.परिषद.आलिबाग
Post a Comment