जयश्री चौधरी यांनी दिले "दान कवितेचे"


मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : जयश्री चौधरी यांच्या "दान कवितेचे" या पहिल्या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा मुंबईच्या अनुयोग शिक्षण संस्थेच्या दाभोळकर सभागृहात दिमाखात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती आणि दीप पूजनाने झाली. प्रकाशन सोहळ्यास अनुयोग शिक्षण संस्थेचे सर्वेसर्वा सतिशचंद्र चिंदरकर हे अध्यक्ष तसेच सुप्रसिद्ध लेखक आणि कवी महेश घाटपांडे हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. 
मान्यवरांच्या कविता आणि विचार यांनी कार्यक्रम कायम स्मरणात राहील असा झाला. सृजनसवांद प्रकाशनने सदर काव्यसंग्रहाच्या निर्मितीस न्याय दिला आहे. सुरेख बांधणी आणि उत्तम कागद तसेच छपाईमुळे पुस्तक सुंदर झाले आहे. सदर काव्यसंग्रहाचे  मुखपृष्ठ तेज वाघ यांनी तयार केले आहे. तर ख्यातकीर्ती नी. ना. श्रीखंडे यांनी त्यांच्या ओघवत्या लेखणीच्या सहाय्याने लक्षवेधक प्रस्तावना लिहिली आहे. 
महेश घाटपांडे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून प्रथम कविता कशी असते याचा आढावा घेऊन "दान कवितेचे" ह्या काव्यसंग्रहातील वैविध्यपूर्ण कवितांची त्यांच्या नेहमीच्या शैलीत उकल केली.
सदर प्रकाशन सोहळ्यास सुप्रसिद्ध गायक मंदार आपटे तसेच रोटरी क्लबच्या मान्यवरांची आणि अनुयोग परिवाराची उपस्थिती होती.
कवयित्री मनीषा घेवडे यांनी सुंदर सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि मान्यवरांची ओळख संतोष खाडये यांनी करून दिली.  
आभारप्रदर्शन सोनाली चौधरी यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा