- 26 जूनला होणार प्रवासाची पहिली चाचणी : पालकमंत्र्यांनी केली पाहणी
टीम म्हसळा लाईव्ह
रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणारा आणि मुख्यत्वे दक्षिण कोकणातील मुख्य प्रवेशद्वार समजला जाणारा आंबेत सावित्री पूल हा दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वाहतुकीसाठी खुला होणार असल्याचे संकेत पालकमंत्री आदिती तटकरे यांनी आज (21 जून) पुलाच्या केलेल्या पाहणीदरम्यान दिले.
येत्या 26 जून रोजी या पुलावरील प्रवासाचा पहिला ट्रायल आणि इतर सर्व गोष्टींचा आढावा घेतला जाणार असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी पाहणीदरम्यान सांगितले. त्यामुळे कोकणातील पर्यटनाला चालना देणारा हा आंबेत सावित्री पूल अखेर वाहतुकीसाठी खुला होणार असल्याचे संकेत पालकमंत्र्यांनी दिले.
पालकमंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, कोकणातील मुख्यतः मंडणगड, दापोली, खेड या तीन तालुक्यांना जोडणारा आणि पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करणारा हा मार्ग ओळखला जातो. त्यामुळे आता सर्व प्रवाशांसह, शैक्षणिक क्षेत्राशी संबंधितांना, इतर व्यावसायिकांच्या दैनंदिन व्यवहाराला चालना मिळणार आहे. येत्या पाच वर्षांत नवीन पुलाचेदेखील काम हाती घेतले जाईल व उत्कृष्ट काम केले जाईल, असे सांगितले.
यावेळी मंडणगड-खेड-दापोली मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम, मुजफ्फर मुकादम, नविद भाईजान अंतुले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बामणे, राऊत, संरचना कन्स्ट्रक्शनचे जोशी, साईट इंजिनिअर लखन आदि उपस्थित होते.

Post a Comment