शब्द शंकरपाळी साहित्य समूहाच्या बोधचिन्हाचे लोकार्पण


मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मराठी साहित्य क्षेत्रातील मुंबईतील "शब्द शंकरपाळी साहित्य समूह" यांच्या बोध चिन्हाचे (लोगो) नुकतेच ऑनलाईन लोकार्पण करण्यात आले असे समूहाचे संस्थापक भूषण सहदेव तांबे यांनी ऑनलाईन जाहीर केले.

या अप्रतिम बोधचिन्हासह समूह तांबे यांनी एक घोषवाक्य सुध्दा जाहीर केले. "शब्दालंकाराचे कौशल्य" असे हे एकमेव आणि आकर्षक घोषवाक्य या बोधचिन्हाला देण्यात आले आहे.   प्रकाशन होताच या बोधचिन्हाचे सर्व स्तरावरून खूप कौतुक करण्यात येत आहे. शब्द शंकरपाळीसाठी मिळालेली ही नवी ओळख त्याचे नावलौकिक अजून उच्च स्तरावर नेईल यात कोणतीच शंका नसेल अशी आशा तांबे यांनी व्यक्त केली आहे. 

या बोधचिन्हाची निर्मिती विघ्नेश पाष्टे, रत्नागिरी यांनी तर घोषवाक्य भूषण सहदेव तांबे यांनी केले. अवंतिका महाडिक यांच्या पुढाकाराने आणि नेतृत्वाने हे कार्य यशस्वी होण्यास फार मोठे सहकार्य लाभले, असे तांबे यांनी नमूद केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा