म्हसळा -प्रतिनिधी
निसर्गचक्र आणि त्याचे संतुलन राखायचे असेल तर जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून त्याची जोपासना करणे काळाची गरज बनली आहे.नैसर्गिकरित्या माणसाला झाडेच वाचवु शकतात.कोरोना कालावधीत ऑक्सिजनच्या कमतरतेने सर्वांनाच याची जाणीव झाली आणि जागृत करून निदर्शनास आणले आहे.कोकणात गेल्या सव्वा वर्षाचे कालावधीत "निसर्ग चक्री वादळ"आणि"तोक्ते चक्री वादळ" अशा दोन भयंकर वादळाने निसर्गाची मोठ्या प्रमाणात हानी केली.होत्याचे नव्हते झाले.बागायती,जंगले उदवस्थ झाली.झालेली हानी पुढील 10 वर्षांत भरून निघणार नसली तरी ती भरपाई करण्यासाठी आता फक्त आणि फक्त वृक्षारोपण करणे आवश्यक असल्याने शासन,वेगवेगळ्या सामाजिक संस्था पुढे होऊन वृक्ष लागवड करीत आहेत म्हसळा तालुक्यात मी मराठी प्रतिष्ठान रायगड यांच्या वतीने ग्रुप ग्रामपंचायत मांदाटने येथील पाष्टी व मोरवणे येथे नुकतेच 500 वृक्षांचे रोपण करण्यात आले. पंचायत समिती सभापती सौ. छायाताई म्हात्रे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला या वेळी कार्यक्रमाला सरपंच चंद्रकांत पवार,माजी सरपंच श्रीपत मनवे,राजाराम धुमाळ,विस्तार अधिकारी श्री गायकवाड,कृषी अधिकारी बागकर,पाष्टी शाळा चेअरमन शांताराम कांबळे,प्रतिष्ठाण सल्लागार अनंत रिकामे,ग्रामसेवक ठाकरे,मी मराठी प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते,शाळा शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.
Post a Comment