म्हसळा -श्रीवर्धनला पावसाने झोडपले.



जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 63 मि.मी. पावसाची झाली नोंद.
(म्हसळा प्रतिनिधी)
संपूर्ण रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 63.25 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि.1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 475.59  मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आजपर्यंत जिह्यांत सर्वात जास्त श्रीवर्धन ७८२ मि.मि., म्हसळा ६४० मि.मि, तळा ५६८ मि.मि पावसाची नोंद झाली आहे.दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुका निहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे-श्रीवर्धन- 213.00 मि.मी,मुरुड- 150.00 मि.मी,रोहा- 107.00 मि.मी.,म्हसळा- 96.00 मि.मी., अलिबाग- 74.00 मि.मी.,तळा- 71.00 मि.मी.,पोलादपूर- 57.00 मि.मी,खालापूर- 53.00 मि.मी, माणगाव- 48.00 मि.मी., महाड- 48.00 मि.मी.,कर्जत- 35.00 सुधागड-23.00 मि.मी., पेण- 13.00 मि.मी., उरण-11.00 मि.मी.,माथेरान- 10.60 मि.मी.,पनवेल- 2.40असे आजचे एकूण पर्जन्यमान 1 हजार 12.00 मि.मी. इतके आहे. त्याची सरासरी 63.25 मि.मी. इतकी आहे. एकूण सरासरी  पर्जन्यमानाची टक्केवारी 15.13 टक्के इतकी आहे.
  म्हसळा तालुक्यात पेरणीची कामे पूर्ण झाली असून भात २४० ऐकर,नागली ४० ऐकर,वरी १० ऐकर मध्ये पेरणी झाली आहे.तालुक्यात भात २४०० ऐकर,नागली ४००ऐकर,वरी १०० ऐकर क्षेत्रा मध्ये पिक घेतले जाते.
   पावसाची संततधार पण व्यत्यय नाही.
तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ३५०० मि.मी आहे, अद्यापपर्यंत ६४० मि.मी पाऊस झाला आहे, म्हसळा शहरा नजिकची, जानसई,सावर, व देहेन वरून येणाऱ्या नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा