स्थानिक गुन्हे अन्वेषण रायगडने गाड्यांचे पार्ट चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या आवळल्या मुसक्या : तीन आरोपी जेरबंद.



(म्हसळा प्रतिनिधी)
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगड यानी इको गाडीचे सायलेन्सर चोरणाऱ्या ३ सराईत गुन्हेगाराना जेरबंद केले. वडखळ पोलीस ठाणे गुन्हा रजि नं 65/2021 भादवि कलम  379, या गुन्ह्यात तीन इको गाडीचे सायलेन्सरचोरीला गेले होते. या प्रकारचे गुन्हे जिल्ह्यांतील नेरळ, खालापूर,वडखळ,कर्जत पेण, या ठिकाणी देखील दाखल आहेत. नमूद गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगड आणि वडखळ पोलीस यांच्याकडून करण्यात येत होता. सदर तपासादरम्यान सपोनि धनंजय पोरे व त्यांच्या पथकाला सायलेन्सर चोरी करणारी टोळी कुर्ला मुंबई त्याचे कार्यरत असल्याचे समजले. त्यावरून नमूद पथकाने कुर्ला येथून खालील ३आरोपीना ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये 1.मिनाज अब्दुल करीम खान, 2. सैफ  दिलशाद खान, 3. आकाश जीतराम शर्मा, सर्व राहणार कुर्ला मुंबई नमूद आरोपी त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली  असून त्यांच्या कडून गुन्ह्यात चोरीस गेलेले एकूण 24 इको गाडीचे सायलेंसर जप्त करण्यात आले. नमूद आरोपी त्यांचेकडून सन 2020 सालचे 5 गुन्हे व 2021 सालाचे  5 गुन्हे उघडकीस आले आहे. नमूद आरोपी यांच्याकडून आत्तापर्यंत 3 लक्ष 90 हजार 500/-रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर आरोपी यांनी अशाच प्रकारचे गुन्हे नवी मुंबई, पनवेल कळंबोली, उरण, पिंपरी-चिंचवड, तसेच गुजरात, व राजस्थान, या ठिकाणी केले आसल्याचे त्यानी कबूल केले.  गुन्हा करण्यासाठी वापरलेली वॅगनर कार देखील आरोपी त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आली आहे. सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि धनंजय पोरे, पोहवा/799 अमोल हंबीर,पोहवा/1088 स्वप्नील येरुंणकर, पोहवा/838  सचिन शेलार, पो शि/2329 अनिल मोरे, यांनी बजावली आहे.

फोटो :  स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगड ने जेरबंद केलेली  सायलेन्सर चोरी करणारी टोळी

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा