म्हसळा लाईव्ह
एकेकाळी घरातील संदेशाचे देवदूत समजणारे पोस्टमेन परदेशावरून येणारी तार म्हणजे जणू देवदूताने पाठवलेला संदेशच म्हणणारे लोक पोस्टमेन कधी येतो अशी वाट पाहणारे ग्रामीण भागातील चहाते आता 38 वर्षाच्या सेवा देणार्या पोस्टमेनला आज निरोप समारंभ करावा लागला केल्टे गावातील शेतकरी वर्गातील सर्व सामान्य एक दामाजी रामचंद्र पवार हे पोस्ट कार्यलयात 1986 पासून 126 च्या महिन्याच्या पगारावरती सेवा करण्याचे काम आज वय वर्ष 65 वयापर्यंत प्रामाणिकपणे केले केल्टे पोस्ट कार्यालयाला जोडणारे ग्रामीण भाग म्हणजे केल्टे गाववरून 9 किलो असलेला रुद्रवट गाव तर 7 किलो मीटर असलेला घुम तर पुढे 5 किलो मीटर असलेला नेवरूळ 4 किलो मीटर असलेला चंदनवाडी अशा 25 किलो मीटरचा असलेला फेरा ते दररोज पायी कोणत्या साधनांचा वापर न करता प्रामाणिक पणे करत होते लोकांचे आलेले पत्र,रजिस्टर,मणी ऑर्डर, शासकीय कार्यालयाचे टपाल अगदी ते प्रामाणिकपणे ते पोहचवत होते. घराघरामध्ये जोडलेला नाता त्यांना आजही समाधान देत आहे. टपाला सहित गावात समाजात आणि सामाजिक कार्यलयात त्यांनी चांगले योगदान केले आहे. त्यांचा सेवानिवृत्त कार्यक्रम म्हसळा पोस्ट कार्यालयात म्हसळा डाक घराचे श्रीकांत महत्रे यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आला यावेळी म्हसळा डाक चे लेखनिक सुनील कुमार, पोस्टमेन अरुण जंगम,मेघना कदम केल्टे पोस्ट मास्तर संध्या मिंडे, चिखलप पोस्ट मास्तर विजय शिंदे, खरसई पोस्ट मास्तर सहदेव म्हात्रे तसेच अनंत जंगम साईचे डाकपाळ पटेल हे केल्टे गावाचे उपाध्यक्ष किसन पवार व अन्य कुटुंब उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी पवार यांना माणगावचे निरीक्षक होळगरे मेल होर्सेल, पारकर यांनी शुभेच्छा दिल्या. सेवानिवृत पवार यांनी आपल्या 38 वर्षाचा सेवेतील कार्यकाळाचा मोजक्या शब्दात सांगताना प्रामाणिकपणा कर्तव्यनिष्ठा व सचोटी या आधारावर सेवा केल्यास कोणत्याच शेरे बुक वरती कोणत्याच अधिकार्याचा वाईट शेरा मिळणार नाही. माझे शिक्षण जारी 3 री असले तरी मी आज पोस्ट कार्यालयामुळे इंग्रजी वाचू लिहू शकलो कमी शिक्षण असले तरी पोस्ट मास्तर म्हणून मी प्रामाणिकपणे अचूक काम केले आहे. अचूक केलेल्या कामाचे मी आजही समाधान मिळत आहे. त्यामुळे सर्वांनीच प्रामाणिकपणे काम करा हीच सर्वांना सदिच्छा.
Post a Comment