कुणबी समाज नेते कै.अनंत उर्फ बाळशेठ लोखंडे यांची प्रथम जयंती साजरी.


तळा- किशोर पितळे
कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा तालुका तळा यांच्या वतीने कुणबी भवन तळा येथे कुणबी समाजातील दानशूर कणखर नेतृत्व,कर्तृत्वलढवय्ये नेते आदरणीय स्व.अनंत उर्फ बाळशेट लोखंडे याची जयंती कुणबी भवन तळा येथेसाजरी करण्यात आली यावेळी तळा शाखेचे सल्लागार रविद्र मांडवकर, खजिनदार भानू मंचेकर,सह.खजिनदार  महादेव बैकर ,तळा तालुका ओ.बी.सी. संघर्ष समिती अध्यक्ष सचिन कदम,रमेश पिंपळे, प्रशांत नांदगावकर,इम्रान बागवान मित्र परीवार पत्रकार किशोर पितळे इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते...यावेळी कै.बाळशेट यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला व भावपुर्ण आदरांजली वाहिली.२४जून बाळशेट यांचा जन्म दिवस या दिवसालाअनेक समाज बांधव,सहकारी, मित्र मंडळी, राजकीय नेते,पुढारी,हितचिंतक यांच्या शुभेच्छा दिल्या जात होत्या.पण नियतीने कोरोना महामारीत डाव साधला आणी काळाच्या पडद्याआड नेले तळा तालुक्या सह राजकीय क्षेत्र शोक सागरात बुडाला आहेच.आज देखील एकही दिवस आठवणी शिवाय जात नाही.अशा  दानशूर व्यक्ती ची जयंती साजरी करताना अतीव दुःख होत आहे. बाळशेट पुन्हा या ..पुन्हा या अशा शब्दांत उपस्थित मान्यवर समाज बांधवानी आदरांजली वाहिली. 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा