तळा किशोर पितळे
कोरोना विषाणू संक्रमण रोखण्यासाठी शासन मोठ्या प्रमाणावर विविध उपाय योजना करीत असल्याने नियंत्रणात येत आहे. याचाच एक भाग म्हणून तळा प्राथमिक आरोग्य केंद्रात १८ते ४४ वर्ष वयोगटातील लाभार्थीसाठी लसीकरण सुरू करण्यात आले असून या वयोगटातील व्यक्तींनी लाभ घ्यावा असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल बिरवाटकर यांनी केले आहे.१८ते४४वयोगटातील सर्व नागरिकांना मोफत लस देण्यात येणार असून दिनांक २४ जून२०२१ पासून आपल्या रायगड जिल्ह्यातील सर्व PHC प्राथमिक आरोग्य केंद्रात) मध्ये (सब सेंटर वगळता) १८ते४४ वर्ष वयोगटातील लाभार्थींसाठी लसीकरण सुरू करण्यात येत असून१८ ते ४४ व ४५+ वर्ष वयोगटातील लाभार्थीसाठी PHC मधील उपलब्ध लस साठ्यानुसार लसीकरण करण्यात येणार आहे COWIN अँप्लिकेशन बाबत सूचना-१)नेहमी प्रमाणेच कोविन अँप्लिकेशन मध्ये LOG IN करावे.२)LOG IN केल्यावर एकाच तारखेला १८ ते ४४ व ४५+ चे सत्र आपणास दिसून येईल व आपण एकाच ID वरून दोन्ही सत्र सुरू करू शकतात.३) *प्रत्येक session site वर 2 लाभार्थी हे ऑनलाइन Booking करून येऊ शकतात त्यानंतर चे सर्व लाभार्थी हे आपणास Walking (ONस्पॉट) पद्धतीने करावयाचे आहेत.४)दुसरा डोस घेण्यास आलेल्या लाभार्थींना preference ने लस देण्यात यावी.१८ ते ४४ वर्ष वयोगटातील लाभार्थींना फक्त PHC मध्ये लसीकरण करण्यात येईल कोणत्याही उपकेंद्र मध्ये १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थींना लसीकरण करता येणार नाही.असे आरोग्य विभागाकडून कळवीण्यात आले आहे कृपया याची नोंद घ्यावी.
Post a Comment