तळा-किशोर पितळे
तळा येथील सुप्रसिद्ध डॉ.सतीश गो.वडके यांचे सुपुत्र डॉ.शंतनु वडके यांचे नेत्र रोग तज्ञ यांचे नियोजित सुसज्ज अत्याधूनिक पध्दतीचे सर्व सुविधाउपलब्धअसलेलेनेत्र रोगहाँस्पिटलचेभूमीपूजन १३ जून रोजी डॉ.सतीश वडके यांच्या हस्ते विधीवत पूजन करून करण्यात आले.डॉ.शंतनू वडके यांनी MBBS(MD) आय स्पेशालिस्ट झाले असून तळा सारख्या ग्रामीण दुर्गम डोगराळ भागातील जनतेची सेवा करण्याची ईच्छा असल्याने महात्मा गांधीनी "गावाकडे चला गावाचा विकास करा" चा दिलेला संदेशाचे पालन करीत लवकरच सुसज्ज हाँस्पिटलचे उद्घाटन करण्यात येणार आहे.यावेळी भार्गव (अप्पा) सप्रे, रामभाई वडके डॉ.श्रुती सतीश वडके, किरणशेट देशमुख,राकेशशेट वडके,डॉ.नीरज देशमुख,डॉ.मनोज पाथरे,भारत वडके,डॉ चंद्रकांत विचारे लिलाधर खातू नमीत पांढरकामे, श्रीराम कजबजे प्रदिप मेकडे समाज बांधव मित्र परिवार उपस्थित होते.

Post a Comment