टँकर मुक्त म्हसळ्या तालुक्यातील ९ गावे व १७ वाडया टंचाईग्रस्त



प्रा.आ.केंद्र मेंदडी व ९ वाड्याना मंजुरी
निर्सगसंपन्न तालुक्याची भिस्त विंधण विहीरींवर.

संजय खांबेटे : म्हसळा 
३६०० मि.मि.सरासरी पर्जन्यमान असणारा म्हसळा तालुका हा २००८-०९ मध्ये टँकरमुक्त झाला होता परंतु वाढती लोकसंख्या,पाण्याची वाढती मागणी, वाढते उष्णतामान आणि  विविध भौगोलीक कारणानी या वर्षी तालुका टंचाई आराखडयांत ९ गावे व १७ वाड्यांची टंचाई आराखडयात वाढ करण्यात आली.ती गावे पुढील प्रमाणे तुरूंबाडी,देहेन,मेंदडी प्रा.आ. केंद्र, खारगाव खुर्द, कुडगाव कोंड,काळसुरी, रोहीणी, आडी ठाकूर व घूम आणि तालुक्या तील१७वाड्या त्यामध्ये  मेंदडी आदीवासी वाडी,आगरवाडा बौद्धवाडी,आगरवाडा आ.वाडी,तोराडी कुणबी वाडी,तोराडी आ.वाडी,लेप आ.वाडी, वाघाव बौद्धवाडी, कृष्णनगर, कोंझरी वरची वाडी, देवघर बौद्धवाडी,घोणसे बौद्धवाडी, चिखलप आ. वाडी,घोणसे म्हशाची वाडी, रेवली बौद्ध वाडी,स्वयंभू गुरुदत मंडळ,आशा ९ गावे आणि १७ वाड्यांचा २०२१ च्या टंचाई आराखडयांत समावेश करण्यात आला आहे.
  कोकणात सर्वात जास्त पाऊस म्हसळ्या त पडूनही प्रशासनाकडून योग्य नियोजन होत नसल्यामुळे पाण्याची एप्रिल - मे या कालावधीत  दुर्भिक्ष होते.सातत्याने नागरिकाना टंचाई जवळ सामना करावा लागतो आहे .
    २०-२१च्याटंचाई कृती आराखडयांतील १गाव व ९वाड्याना  पालकमंत्री ना.अदीती तटकरे यानी विंधण विहीरी मंजूर  केल्या आहेत.त्यामुळे नागरिकाना दिलासा मिळणार आहे.विंधण विहीर मंजुर झालेल्या गाव -वाड्या पुढील प्रमाणे  १गाव प्रा.आ. केंद्र मेंदडी, वाड्या १) मेंदडी (आ.वाडी) २)आगरवाडा बौद्धवाडी ३)आगरवाडा आ. वाडी,४)तोराडी कुणबी वाडी ५)तोराडी आ. वाडी ६) वाघाव बौद्धवाडी, ७)घोणसे बौद्धवाडी,८) चिखलप आ.वाडी,९)रेवली बौद्धवाडी जिल्हाधिकारी रायगड यानी रु ६५ लक्ष मंजूर केले आहेत.

"मानवजातीच्या अस्तित्वासाठी पाणी महत्वाची भूमिका बजावते. पिण्यासाठी, सिंचन आणि औद्योगिक वापरासाठी पाण्याची मागणी वेगाने वाढतआहे. वाढती मागणी देखील लोकसंख्या वाढीशी संबंधित आहे, ग्रामिण भागातही आरोग्याचे दृष्टीकोनातून शौचालयाचा वापर वाढल्याने प्रतिमाणशी १३५ लिटर पाणी पुरवठा व्हावा अशी मागणी पुढे येत आहे."

                         प्रा.आ केंद्र मेंदडी

"विधण विहीरी व म्हसळा तालुका आभ्यास केला असता गावातील बहुतांश वाड्या (बौध्दवाडी,आ.वाडी) या अतिशय दुर्गम व डोंगराळ भागात असतात त्यामुळे वाहतुकीचे मार्ग नसतो त्यामुळे अनेक साईटवर बोअरींग मशीन अथवा रीग पोहचत नाही,वाड्यांच्या भौगोलीक रचने मुळे मागील तीन वर्षात विंधण विहीरीना ५० % यश आले आहे".
निवृत्त आधिकारी भूजल सर्वेक्षण व विकास प्राधिकरणाच्या (जीएसडीए) रायगड अलिबाग

खरसई श्रणातील पाणीसाठ्याचा वापर भविष्यांत कसा करावा याचा आभ्यास करताना विधान परिषदेचे आमदार अनिकेत तटकरे (संग्रहीत छायाचित्र )


Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा