महागांव उप प्राथमिक आरोग्य केंद्रातल सीकरण सुरू ; परिसरातील नागरिकांची उत्तम सोय.



तळा -किशोर पितळे

तळा तालुक्यातीलनव्याने सुरुकरण्यात आलेल्या महागांव उप प्राथमिक आरोग्य केंद्रात पालकमंत्री रायगड जिल्हा तथा राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य ना.कु.आदितीताई तटकरे यांच्या प्रयत्नाने महीला बालकल्याण सभापती जि.प यांच्या उपस्थितीतआज बुधवार १२/०५/२०२१  रोजी तळा तालुक्यातील महागाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ५४ वर्षे वरील नागरिकांना कोरोनावर मात करण्यासाठी लस उपलब्ध करून लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे महागाव प्राथमिक आरोग्य केंद्रात पहिली लस साळशेत गावचे नागरिक कृष्णा लोंढे यांना देण्यात आली.तालुका ठिकाणापासून अंदाजे१५कि.मी अंतरावर महागांव असल्याने औषधोपचारासाठी तळा येथे यावे लागत होते.ही समस्या लक्षात घेऊन उपआरोग्य केंद्राचीमंजुरी देण्यात आली होती सदर आरोग्य केंद्राचे बांधकाम पुर्ण होऊन सूरू करण्यात आले नव्हते. तळा पत्रकार संघटनेने सातत्याने पाठपुरावा करून वर्षभरापूर्वी कार्यान्वित करण्यात आले. त्यामुळे आज कोरोना महामारी रोगावर मात करण्यासाठी लसीकरण सुरू करण्यातआले.त्यामुळे या पंचक्रोशीतील जनतेचीउत्तमसोय झाली असून वेळ व पैसा वाचला असल्याने समाधान व्यक्त करीत आहेत. यावेळी तळा पंचायत समिती सभापती अक्षरा सचिन कदम,रायगड जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती गीता उत्तम जाधव,सरपंच, सुषमा कसबले, उपसरपंच, सचिनजाधव, अँड उत्तम जाधव,सचिन कदम, कीशोर शिंदे,अनंत खराडे, नितीन कदम, कमलाकर मांगले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विनोद गोरेगावकर,डॉअमोल बिरवटकर  डॉ.पाटीलमॅडम,मोहीत(बाबू ) मोरे,आशा प्रवर्तक नूतन ठिगळे, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसपार्टी चे कार्यकर्ते व प्राथमिक आरोग्य केंद्र महागावचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा